• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • सिल्व्हर गर्ल मीराबाई चानूनं घेतली सचिन तेंडुलकरची भेट, म्हणाली...

सिल्व्हर गर्ल मीराबाई चानूनं घेतली सचिन तेंडुलकरची भेट, म्हणाली...

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताला पहिले मेडल वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) मिळवून दिले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर मीराबाईनं सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) भेट घेतली आहे.

  • Share this:
    मुंबई, 11 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताला पहिले मेडल वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) मिळवून दिले.  मीराबाईनं 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत हे मेडल जिंकले. मीराबाईनं स्नॅच गटात 87 आणि क्लीन अँड जर्क गटात 115 किलो वजन उचललं. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी Mirabai Chanu wins Silver Medal) ती पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. यापूर्वी सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत करनाम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. मीराबाई चानूनं या ऐतिहासिक कमगिरीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) भेट घेतली आहे. मीराबाईनं या भेटीचा फोटो शेअर करत याची माहिती दिली. 'सचिन तेंडुलकरची भेट घेऊन आनंद झाला. त्याचे प्रेरणादायी शब्द नेहमी माझ्यासोबत राहतील,' अशी प्रतिक्रिया मीराबाईनं दिली आहे. सचिन तेंडुलकरनंही या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'टोकयो ऑलिम्पिकमधील मीराबाईचे प्रेरणादायी अनुभव ऐकूण आनंद झाला,' अशी भावना सचिननं व्यक्त केली आहे. मीराबाईनं जपली माणुसकी मीराबाईच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे देशभर कौतुक होत आहे. ज्या ऑलिम्पिक मेडलचा ध्यास घेऊन तिने आजवर कष्ट केले, ते लक्ष्य अखेर पूर्ण झालं आहे. यशाच्या शिखरावर असतानाही मीराबाई तिच्या संघर्षाचा काळ विसरलेली नाही. ऑलिम्पिक मेडल जिंकून घरी परतल्यानंतर तिला सर्वात प्रथम अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या व्यक्तींची  आठवण झाली. मीराबाईचे गाव ते इफांळमधील तिचे ट्रेनिंग अकादामी यामध्ये 25 किलोमीटर अंतर होते. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे स्वतंत्र वाहन घेऊन हा प्रवास करणे तिला शक्य नव्हते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ट्रक ड्रायव्हर्सनी तिला मदत केली. ते मीराबाईला फुकट इंफाळपर्यंत नेत असत. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच मीराबाईला वेटलिफ्टिंगचे ट्रेनिंग घेणे शक्य झाले आणि पुढे तिनं इतिहास घडवला. Tokyo Olympics मधील गोल्ड मेडल विजेत्या नीरज चोप्राच्या कोचची सुट्टी, मागितला होता 'इतका' पगार ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर घरी परतलेल्या मीराबाईनं सुमारे 150 ट्रक ड्रायव्हर्स आणि हेल्परना घरी बोलावलं. त्यांचा टी शर्ट, मणिपूरी शाल  देऊन सत्कार केला. तसंच त्यांना आग्रहानं जेवायला दिलं. या प्रसंगी ती चांगलीच भावुक झाली होती.
    Published by:News18 Desk
    First published: