• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • The Great Wall of India! भारतीय गोल किपरचं ऑस्ट्रेलियाकडून कौतुक, वॉर्नर म्हणाला...

The Great Wall of India! भारतीय गोल किपरचं ऑस्ट्रेलियाकडून कौतुक, वॉर्नर म्हणाला...

भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Women's Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे हॉकी टीमनं प्रतिस्पर्ध्यांचंही मन जिंकलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Women's Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकमध्ये  (Tokyo Olympics 2020) ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे हॉकी टीमनं समर्थकांसह प्रतिस्पर्ध्यांचंही मन जिंकलं आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 नं पराभव करताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. यामध्ये भारतीय फॅन्ससोबतच ऑस्ट्रेलियन मंडळींनीही खुलेपणानं टीमचं कौतुक केलं आहे. भारतामधील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल (Barry O’Farrell) यांनी भारतीय टीमचं अभिनंदन करताना गोल किपर सविता पूनियाचं  (Savita Punia) विशेष अभिनंदन केलं आहे. बॅरी यांनी सविताचं वर्णनं 'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया' (The Great Wall of India) असं केलं आहे. सवितानं क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 9 पेनल्टी कॉर्नर सेव्ह केले. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा (SRH) माजी कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) यानंही भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे. भारतीय टीमच्या विजयाबद्दल सनरायझर्स हैदराबादनं केलेलं ट्विट वॉर्नरनं रिट्विट केलं आहे. " शाब्बास मुलींनो! तुम्ही तुमचा सर्वश्रेष्ठ खेळ दाखवला. भारताचेही अभिनंदन. गुड लक!' अशी प्रतिक्रिया वॉर्नरनं दिली आहे. Tokyo Olympics : भारताला आज तिसऱ्या मेडलची अपेक्षा! कमलप्रीत कौरला इतिहास रचण्याची संधी भारतीय महिला  टीमची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली. मात्र भारताने शेवटच्या दोन सामन्यात आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. क्वार्टर फायनलमध्ये भारतीय टीमनं तीन वेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत अर्जेंटीनाशी होणार असून हा सामना बुधवारी होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: