मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics: सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात, पहिल्याच फेरीत पराभव

Tokyo Olympics: सानिया मिर्झाचं आव्हान संपुष्टात, पहिल्याच फेरीत पराभव

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पदक जिंकण्याचं भारताचं आणखी एक स्वप्न भंग पावलं आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झाला (Sania Mirza) महिला दुहेरीतील पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पदक जिंकण्याचं भारताचं आणखी एक स्वप्न भंग पावलं आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झाला महिला दुहेरीतील पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सानिया मिर्झाचं ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा होती. बीजिंग, लंडन आणि रियो या तीन ऑलिम्पिकचा अनुभव असलेल्या सानियाकडून यंदा मोठी अपेक्षा होती. मात्र सानिया मिर्झा आणि अंकिता रैना (Sania Mirza and Ankita Raina) या जोडीचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. युक्रेनच्या जोडीनं त्यांचा पराभव केला.

सानिया-अंकिता जोडीनं मॅचची सुरुवात जबरदस्त केली होती. त्यांनी पहिला सेट 6-0 असा एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर त्यांचा खेळ घसरला. नंतरचे दोन्ही सेट त्यांनी गमावले. पहिला सेट जिंकूनही सानिया-अंकिता जोडीचा 6-0 6-7(0) 8-10 असा तीन सेटमध्ये पराभव झाल्यानं त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्या दिवशी भारताला महिलांच्या एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये अपयश आले होते.  मनू भाकर (Manu Bhaker) आणि यशस्विनी देसवाल (Yashaswini Deswal) यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंट्समध्ये या दोघींकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र त्यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. त्यानंतर सानिया-अंकिता जोडीनंही निराशा केली.

The Hundred : मुंबईकर क्रिकेटरचं इंग्लंडमध्ये वादळ, 18 बॉलमध्ये काढले 74 रन

बॅडमिटनमध्ये पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि पुरुषांच्या रोईंग टीमनं आपले सामने जिंकत पदकांची अपेक्षा कायम ठेवली आहे.   सिंधूनं इस्रायलच्या पोलीकरपोवाचा 21-7, 21-10 असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. रोईंग टीममधील अर्जुन लाल (Arjun Lal) आणि अरविंद सिंह (Arvind Singh) या जोडीनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

First published:

Tags: Olympics 2021, Sania mirza