हरीद्वार, 4 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताची महिला हॉकी टीम सेमी (Indian Women Hockey Team) सेमी फायनलमध्ये अर्जेंटीना विरुद्ध पराभूत झाली. पहिल्यांदाच ऑलिम्पिक सेमी फायनलमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमनं जोरदार लढत दिली. मात्र त्यांची ही झूंज अखेर अपयशी ठरली. अर्जेंटीनानं भारताचा 2-1 नं पराभव केला. भारताच्या या पराभवानंतर फटके फोडल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.
हॉकी टीममधील खेळाडू वंदना कटारीया (Vandana Kataria) घराजवळ फटाके फोडण्यात आले. हरीद्वार जवळ वंदनाचं गाव आहे. त्या गावातील काही तरुणांनी भारताचा पराभव होताच फटके फोडले. वंदनाच्या नातेवाईकांनी त्यांच्या या कृत्यावर आक्षेप घेतला. गावातील अन्य लोकांनीही त्यांना साथ दिली. या प्रकरणात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी वंदनाच्या नातेवाईकांनी केली आहे.
भारतीय हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर टीममधली एक खेळाडू वंदना कटारिया हिच्या हरिद्वारमधल्या घराजवळ कुणीतर फटाके फोडले. त्यामुळे या परिसरात नाराजी पसरली आणि तणावही. सध्या या प्रकरणी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. #Hocky #TeamIndia #olympic2020 pic.twitter.com/exkgLn83Yh
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2021
भारतीय टीमची ऐतिहासिक कामगिरी
भारताचा अर्जेंटीना विरुद्ध सेमी फायनलमध्ये पराभव झाला. मात्र भारतीय महिलांनी त्यांच्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केले आहे. भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता.
त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारतीय टीमला अजूनही ब्राँझ मेडल मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी ब्रिटनचा पराभव करावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Olympics 2021