मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics : मेडल गमावल्यानंतर हॉकी टीमच्या कॅप्टननं देशवासियांना केलं 'हे' आवाहन

Tokyo Olympics : मेडल गमावल्यानंतर हॉकी टीमच्या कॅप्टननं देशवासियांना केलं 'हे' आवाहन

भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Women Hockey Team) ऑलिम्पिक इतिहासातील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन टोकयोमध्ये केलं आहे. टीमच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीवर कॅप्टन राणी रामपालनं (Rani Rampal) पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

टोकयो, 6 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Women Hockey Team) ऑलिम्पिक इतिहासातील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन टोकयोमध्ये केलं आहे. राणी रामपालच्या (Rani Rampal) टीमला ब्रॉन्झ मेडलनं थोडक्यात हुलकावणी दिली. शुक्रवारी झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात ब्रिटननं भारतीय हॉकी टीमचा 4-3 नं पराभव केला. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी फोनवर बोलतानाही खेळाडू भावुक झाल्या होत्या. टीमच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीवर कॅप्टन राणी रामपालनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण स्पर्धेत टीमला दिलेल्या पाठिंब्याबात राणीनं देशवासियांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर सर्वांना एक आवाहन देखील केलं आहे.

'आम्ही खूप निराश झालो आहोत. कारण आम्ही मेडलच्या अगदी जवळ होतो. आम्ही 0-2 ने पिछाडीवर होतो. त्यानंतर आम्ही बरोबरी साधली. आम्ही 3-2 ने आघाडी घेण्यातही यशस्वी झालो. आता काय बोलावं हे मला सुचत नाहीय, पण आम्ही ब्रॉन्झ मेडल जिंकू शकलो नाहीत याचं खूप वाईट वाटत आहे.

मी सर्व देशवासियांचे आभार व्यक्त करते. त्यांनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला. आम्ही काही तरी करु शकतो असा तुम्हाला विश्वास होता. मला खात्री आहे की ब्रॉन्झ मेडल मिळालं नसलं तरी तुम्ही यापुढेही आम्हाला पाठिंबा द्याल. आम्हाला तुमच्या पाठिब्याची गरज आहे.' असं आवाहन राणीनं केलं.

Tokyo Olympics 2020 : पंतप्रधानांनी कौतुकासाठी केला हॉकीपटूंना फोन, खेळाडूंना अश्रू अनावर! VIDEO

भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता. त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनानं भारताचा 2-1 नं पराभव केला. ब्रॉन्झ मेडलच्या मॅचमध्ये भारतीय टीमनं जोरदार प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

First published:
top videos

    Tags: Hockey, Olympics 2021