टोकयो, 31 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल जिंकण्याचं पीव्ही सिंधूचं (PV Sindhu) स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. महिलांच्या बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत सिंधूचा चीनच्या ताई झू यिनं (Tai Tzu Ying) पराभव केला. सिंधूनं हा सामना 18-21,12 - 21 असा गमावला. सिंधू हा सामना पराभूत झाली असली तरी मेडलची आशा कायम आहे. सिंधूनं यापुढचा सामना जिंकल्यास भारताला ब्रॉन्झ मेडल मिळेल. सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले होते.
पी.व्ही. सिंधूचा सामना आता चीनच्या होता. दोन दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या या मॅचची सुरूवात रंगतदार झाली. सिंधूनं 7-3 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ताई झू नं काही सुंदर फटके लगावत ही आघाडी कमी केली. पहिल्या हाफमध्ये सिंधूकडं 11-8 अशी आघाडी होती. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकींच्या तोडीस-तोड खेळ केला. त्यामुळे प्रत्येक क्षणाला चित्र बदलत होतं. अखेर ताई झूनं पहिला गेम 21-18 असा जिंकला. सिंधूनं टोकयो ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच एखादा गेम गमावला होता.
पहिल्या गेममधील पराभवानंतर सिंधूला पुढील दोन्ही गेम जिंकणे आवश्यक होते. पण ताई झूनं आक्रमक सुरुवात करत फर्स्ट हाफमध्ये 11-7 अशी आघाडी घेतली. ताई झूनं दुसऱ्या गेममध्ये खेळ आणखी उंचावला होता. सिंधूनं या गेममध्येही जोरदार प्रयत्न केले. पण ताई झू पुढे तिचा निभाव लागला नाही. ताई झूनं दुसरा गेम 21-12 नं जिंकला
#TokyoOlympics: Indian shuttler PV Sindhu loses to Tai Tzu-ying of Chinese Taipei 18-21, 12-21 in women's singles semi-final, to play for bronze tomorrow pic.twitter.com/qaZFyMlhin
— ANI (@ANI) July 31, 2021
सिंधूचा प्रवास
सिंधूनं जपानच्या अकाने यामागूचीचा (Akane Yamaguchi) 21-13, 22-20 असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. सिंधू पहिल्या गेममध्ये 4-6 ने मागे पडली होती. त्यानंतर तिनं कमबॅक करत 11-7 अशी आघाडी घेतली. सिंधूनं आघाडी घेतल्यानं यामूगाचीनं जोरदार प्रतिकार केला. पण सिंधूनं पहिला गेम 21-13 नं जिंकला.
दुसऱ्या गेमध्ये बरोबरी साधण्यासाठी यामागूचीनं जोरदार प्रयत्न केला. पण सिंधूच्या धडाक्यापुढं तिचं काहीही चाललं नाही. सिंधूनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत यामूगूचीवर आघाडी घेतली. सिंधूच्या आक्रमक खेळापुढे जपानच्या अव्वल खेळाडूनं चुका केल्या. सिंधूनं सुरुवातीला 11-6 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर यामागूचीनं मॅचमध्ये पुनरागमन करत 15-15 अशी बरोबरी साधली. सिंधू या गेमममध्ये 18-20 अशी मागे पडली होती. त्यानंतर सिंधूनं सलग 4 पॉईंट्स जिंकत हा गेम आणि सामना जिंकला.
Tokyo Olympics : भारताचे मेडल हुकले, बॉक्सिंगमध्ये पूजा राणी पराभूत
सिंधूनं या स्पर्धेतील मागील 4 मॅचमध्ये आक्रमक खेळ केला होता.सर्व सामने सिंधूनं सरळ गेममध्ये जिंकले होते. त्यानंतर सेमी फायनलमध्येही सिंधूकडून याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती. मात्र सेमी फायनलमध्ये अनुभवी ताई झू नं तिचा पराभव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021