मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : नीरज चोप्राच्या गोल्डनं खेळाडूंमध्ये जोश, गावसकरांसोबत सर्वांनी गायल गाणं VIDEO

Tokyo Olympics : नीरज चोप्राच्या गोल्डनं खेळाडूंमध्ये जोश, गावसकरांसोबत सर्वांनी गायल गाणं VIDEO

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) गोल्ड मेडल जिंकल्यानं सर्वच भारतीय खेळाडूंमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. सुनील गावसकरांसह काही खेळाडूंनी नीरजसाठी खास गाणं गायलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) गोल्ड मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतानं तब्बल 13 वर्षांनी गोल्ड मेडल मिळवलंय. त्याचबरोबर अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) नंतर वैयक्तिक गोल्ड मेडल जिंकणारा नीरज हा दुसरा भारतीय बनला आहे. नीरजच्या या यशानं देशातील सर्वच खेळाडूंमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. प्रमुख खेळाडू आणि क्रीडा पत्रकार यांनी एकत्र येत नीरजसाठी खास गाणं गायलं आहे.

भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Suni Gavaskar), माजी फास्ट बॉलर आशिष नेहरा (Ashish Nehra), माजी टेनीसपटू सोमदेव देवबर्मन यांनी आणि काही क्रीडा पत्रकारांनी एकत्र येत खास नीरजसाठी तयार केलेलं हे गाणं गिटारच्या धूनवर सादर केलं आहे. क्रीडा पत्रकार अयाज मेमन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोमदेव देवबर्मन यांनी हे गाणं तयार केलं असून त्यानंच याला संगीत दिलं आहे.

नीरजने पहिला थ्रो 87.03 मीटर, दुसरा थ्रो 87.58 मीटर, तिसरा थ्रो 76.79 मीटरचा केला. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता मात्र चौथी आणि पाचवी फेरी फाउल गेली. पहिल्या तीन थ्रोमध्ये नीरजची कामगिरी उत्तम ठरली आणि त्याने गोल्ड मेडलवर शिक्कामोर्तब केलं.

IND vs ENG : मोहम्मद सिराज आणि सॅम करनमध्ये भर मैदानात चकमक, पाहा VIDEO

गावसकरांनी अचानक सोडली कॉमेंट्री

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या टेस्टचा शनिवारी चौथा दिवस होता. या टेस्टमध्ये  सुनिल गावसकर यांना  कॉमेंट्री करत असतानाच नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकवल्याचं समजले. त्यानंतर आनंदी झालेल्या गावसकरांनी  ‘मेरे देश की धरती सोना उगले’या गाण्यावर भांगडा केला. ऑलिम्पिक आणि टेस्ट सीरिजचं प्रसारण करणाऱ्या सोनी टेन-3 ने हा क्षण खास प्रेक्षकांसाठी दाखवला. तसंच गावसकरांनी कॉमेंट्री करत असताना जिलेबीही खाल्ली.

First published:

Tags: Olympics 2021