मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली...

Tokyo Olympics : ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली...

वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. या कामगिरीनंतर मीराबाईनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 जुलै : वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या मीराबाईकडून यंदा संपूर्ण देशाला मोठी अपेक्षा होती. मीराबाईनं 202 किलो वजन उचलत ही अपेक्षा पूर्ण केली. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच मेडल मिळालं आहे. भारताच्या स्टार वेटलिफ्टरनं हे मेडल संपूर्ण देशाला समर्पित केले आहे. 'हे एक स्वप्न होते, जे खरे झाले आहे,'अशी भावना मीराबाईनं व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिनं परिवार, कोच आणि फॅन्सचे देखील आभार मानले आहेत. मीराबाईनं तिच्या आजवरच्या करिअरमधील सर्वोच्च कामगिरीनंतर ट्विट करत आपली भावना व्यक्त केली आहे. 'मी हे मेडल देशवासियांना समर्पित करते. त्याचबरोबर माझ्या यशासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानते. मी माझ्या परिवाराची देखील आभारी आहे. विशेषत: माझी आई, जिनं माझ्यासाठी खूप त्याग केला. माझ्यावर विश्वास दाखवला. मला पाठिंबा देण्यासाठी आपले सरकार, क्रीडा मंत्रालय, साई, आयओए, वेटलिफ्टिंग फेडरेशन, रेल्वे, स्पॉनर्स आणि माझ्या मार्केटिंग टीमची देखील मी आभारी आहे. या सर्वांनी या प्रवासात मला सतत पाठिंबा दिला आहे. Tokyo Olympics : सिल्व्हर गर्ल मीराबाई चानूच्या घरी कसं होतं वातावरण? पाहा इमोशनल VIDEO वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील भारताचं हे दुसरं ऑलिम्पिक मेडल आहे. यापूर्वी करनाम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिम्पिकमध्ये (2000) ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. मीराबाईनं यंदा सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. तिने स्नॅच गटात 87 तर क्लीन एंड जर्क गटात 115 असे एकूण 202 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टर हाऊ झिहूनं एकूण 210 किलो वजन उचलत गोल्ड मेडल पटकावलं.
First published:

पुढील बातम्या