टोकयो, 6 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पुरुष कुस्तीच्या 65 किलो वजनी गटामध्ये भारताचा बजरंग पुनियानं (Bajrang Punia) विजयी सलामी दिली आहे. बजरंगची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे. मात्र त्यानं यापूर्वी कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. बजरंगची लढत कझाकस्तानच्या अरनाजर अकमातालीवशी होती. या लढतीमध्ये बजरंगनं विजय मिळवला. या विजयासह बजरंगनं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. टोकयो ऑलिम्पिकमध्ये मेडल नक्की करण्यासाठी त्याला आणखी दोन विजयांची गरज आहे.
पहिल्या राऊंडमध्ये दोन्ही खेळाडूंनी सावध सुरुवात केली. पहिल्या 30 सेकंदामध्ये कुणालाही पॉईंट मिळाला नाही. त्यानंतर बजरंगनं पहिल्या राऊंडमध्ये 3-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या राऊंडमध्ये कझाकस्तानच्या खेळाडूनं 3-3 नं बरोबरी साधली. पण पहिल्या राऊंडमध्ये बजरंगनं अधिक पॉईंट कमावल्यानं त्याला विजयी घोषित करण्यात आले.
#TokyoOlympics | Wrestler Bajrang Punia wins against Kyrgyzstan's E Akmataliev in Men's 65kg Freestyle 1/8 final match, enters quarterfinals pic.twitter.com/VGYxES1jA0
— ANI (@ANI) August 6, 2021
Tokyo Olympics : भारतीय महिलांना मेडलची हुलकावणी, ब्रॉन्झ मेडलच्या लढतीत ब्रिटनकडून पराभव
यापूर्वी महिलांच्या कुस्तीमध्ये भारताला धक्का बसला. महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला पहिल्याच लढतीमध्ये पराभूत झाली. 50 किलो फ्रि स्टाईल गटात सीमाचा ट्यूनेशियाच्या सर्रा हमदीनं 3-1 असा पराभव केला. त्यानंतर पुढच्या लढतीमध्ये हमदीचा मोठा पराभव झाला. त्यामुळे सीमाला ब्रॉन्झ मेडलच्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021