टोकयो, 5 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पुरुष कुस्तीच्या 57 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं. रवी कुमार दहियाची (Ravi Kumar Dahiya) लढत रशिया ऑलिम्पिक समितीच्या (ROC) झावूर यूगऐवशी (Zavur Uguev) होती. यामध्ये रवीचा 4-7 ने पराभव झाला. भारताक़डून यापूर्वी सुशील कुमारनं लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी रवीनं ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हरची कमाई केली आहे.
फायनलमध्ये दोघांनीही सावध सुरुवात केली. झावूरनं पहिले दोन पॉईंट्स मिळवले. त्यानंतर रवीनं लगेच बरोबरी साधली. पहिल्या हाफनंतर झावून 4-2 ने आघाडीवर होता. सेकंड हाफमध्ये दोघांमध्ये जोरदार सामना रंगला. पण त्यानंतर झावूरनं तीन पॉईंट्स घेत 7-2 ने आघाडी घेतली. रवीनं ही आघाडी दोन पॉईंट्सनं कमी केली, पण त्याला गोल्ड मेडल जिंकण्यात अपयश आले.
Ravi Kumar Dahiya gave it his all but couldn't get the better of #ROC's Zavur Uguev. He loses the final bout 4-7.
But he has won the #SILVER medal for #IND 🙌#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion — #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 5, 2021
रवी कुमारचा प्रवास
रवी कुमारनं सेमी फायनलमध्ये कझाकस्तानच्या नूर इस्लाम सानायेवचा (Nurislam Sanayev) पराभव केला. रवी कुमारनं मॅचच्या सुरुवातीला 2-1 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवनं जोरदार खेळ करत रवीवर 9-2 ने आघाडी घेतली. त्यानंतर रवीनं जोरदार कमबॅक करत ही आघाडी 5-9 ने कमी केली. रवीनं त्यानंतर जोरदार खेळ करत 7-9 नं ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर रवीनं नूरचा निर्णायक पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आणि भारताचे मेडल नक्की केले.
रवी क्वार्टर फायनलमध्ये कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरसचा पराभव केला होता रविकुमारनं 57 किलो वजनी गटात हे यश संपादन केलं आहे. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली, दहा गुणांच्या आघाडीमुळे रविकुमारनं वेळ संपण्यापूर्वीच या कुस्ती सामन्यात विजय मिळवला होता. रवी कुमारचं गोल्ड मेडल हुकलं असलं तरी त्याने या स्पर्धेत जोरदार खेळ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिल्व्हर मेडल पटकावल्याबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे.
Ravi Kumar Dahiya is a remarkable wrestler! His fighting spirit and tenacity are outstanding. Congratulations to him for winning the Silver Medal at #Tokyo2020. India takes great pride in his accomplishments.
— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021
रवी हरयणाच्या सोनिपत जिल्ह्यातला आहे. या देशाला कुस्तीची नर्सरी समजली जाते. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये अनेक दिग्गज कुस्तीपटू तयार झाले आहेत. रवी कुमार नाहरी या गावचा असून त्याने वयाच्या 6 व्या वर्षीच कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या 10 व्या वर्षापासून कुस्तीचे प्रशिक्षण त्याने घेतले. 2019 मधील कुस्ती स्पर्धेत रवीनं ब्रॉन्झ मेडल जिंकले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021