मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमधून Good News, मेरी कोमचा विजयी पंच!

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमधून Good News, मेरी कोमचा विजयी पंच!

टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) मधील रविवारचा दिवस भारताच्या अनुभवी खेळाडूंनी गाजवला. लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल  जिंकणारी भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) पहिली मॅच जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) मधील रविवारचा दिवस भारताच्या अनुभवी खेळाडूंनी गाजवला. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेली भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. त्यानंतर भारताची टेबल टेनिस स्टार मानिका बत्रानं (Manika Batra) पहिले दोन गेम गमावल्यानंतर जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. त्यापाठोपाठ लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल  जिंकणारी भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) पहिली मॅच जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

मेरी कोमनं डोमिनिक रिपब्लिकच्या मिगुएलिना हर्नांडेज गार्सिया (Hernandez Garcia) हिचा 4-1 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. मेरी कोमनं पहिल्या फेरीमध्येच आघाडी घेतली. त्यानंतर पुढील दोन राऊंडमध्ये तिने ती आघाडी कायम राखत गार्सियाचा पराभव केला.

यापूर्वी रविवारी सकाळी झालेल्या मॅचमध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत (Rio Olympics) सिल्व्हर मेडलची कमाई करणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं (PV Sindhu) या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

IND vs SL: पहिल्या T20 मध्ये कोण खेळणार? शिखर धवननं दिले संकेत

सिंधूकडून यंदा देशाला गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. सिंधूनं पहिल्या लढतीमध्ये सुरुवात तरी जोरदार केली आहे. सिंधूनं इस्रायलच्या पोलीकरपोवाचा 21-7, 21-10 असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूनं पहिला गेम अवघ्या 13 मिनिटामध्ये जिंकला. पोलीकरपोवानं दुसऱ्या गेममध्ये थोडाफार प्रतिकार करत काही मॅच पॉईंट्स वाचवले. पण, सिंधूच्या धडाक्यापुढे तिचे काही चालले नाही. सिंधूनं दुसरा गेम 21-10 असा जिंकत हा सामना खिशात टाकला.

First published:

Tags: Olympics 2021, Sports