मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : मेडल नाही पण मनं जिंकणाऱ्या 'या' खेळाडूंना मिळणार 11 लाखांचं बक्षीस

Tokyo Olympics : मेडल नाही पण मनं जिंकणाऱ्या 'या' खेळाडूंना मिळणार 11 लाखांचं बक्षीस

ऑलिम्पिकहून परतलेल्या खेळाडूला बेदम मारहाण

ऑलिम्पिकहून परतलेल्या खेळाडूला बेदम मारहाण

टोकयोमध्ये नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) भारताने आजवरच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत काही खेळाडूंना मेडलनं थोडक्यात हुलकावणी मिळाली. अशा खेळाडूंनाही आता 11 लाखांचं बक्षीस मिळणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 ऑगस्ट : टोकयोमध्ये नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) भारताने आजवरच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) गोल्ड मेडल जिंकत इतिहास रचला. त्याचबरोबर भारतीय हॉकी टीमनं (Indian Hockey Team) 41 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये मेडलची कमाई केली.

या स्पर्धेत जे भारतीय खेळाडू कठोर परिश्रम घेऊन, आपलं क्रीडा नैपुण्य पणाला लावून खेळले, त्यांच्या खेळाची, संघर्षाची जोरदार चर्चा झाली. परंतु, ज्यांना पदक मिळू शकलं नाही, त्यांचेही परिश्रम किंवा कौशल्य देखील कमी नव्हते. त्यांनी देखील सर्वोत्तम कामगिरी करत देशवासियांची मनं जिंकली आहेत. अशा निवडक 20 खेळाडूंचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्याचा निर्णय मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) या प्रसिद्ध औषधनिर्मात्या कंपनीने नुकताच घेतला आहे. याबाबतचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.

भारतीय अ‍ॅथलिट्साठी औषधनिर्मिती करणाऱ्या मॅनकाइंड या प्रसिद्ध कंपनीने अशा निवडक 20 खेळाडूंचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्याची घोषणा केली आहे. या 20 खेळाडूंना प्रत्येकी 11 लाख रुपये देऊन कंपनीच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. पदक जिंकू न शकलेल्या, परंतु क्रीडारसिकांची मनं जिंकलेल्या खेळाडूंच्या परिश्रमाचा सन्मान करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ज्या 20 खेळाडूंना 11 लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे, त्यात महिला हॉकी टीमच्या (Women Hockey Team) 16 खेळाडूंसह, बॉक्सर सतीश कुमार, पहिलवान दीपक पुनिया, शूटर सौरभ चौधरी आणि गोल्फर आदिती अशोक यांचा समावेश आहे.

'आम्हाला असं वाटतं की,  प्रत्येक खेळात आपल्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सगळेच जिंकले नसतील; पण त्यांच्या कामगिरीने देशाचं नाव उज्ज्वल झालं आहे,' अशी भावना मॅनकाइंड फार्मा कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव जुनेजा यांनी व्यक्त केली.

IND vs ENG : टेस्ट सीरिजमधून आऊट झाल्यानं इंग्लंडचा अनुभवी खेळाडू भावुक, इमोशनल पोस्ट केली शेअर

भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन

यंदा टोकियो येथे पार पडलेली ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी विशेष संस्मरणीय अशी ठरली. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत सात मेडल पटकावली. यामध्ये 1 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. भालाफेक, बॅडमिंटन, कुस्ती, बॉक्सिंग आणि हॉकी या खेळांमध्ये भारतीय टीमनं मेडल पटकावले.

First published:

Tags: Olympics 2021, Sports