Home /News /sport /

Tokyo Olympics: मानिका बत्राची कमाल, मोठ्या पिछाडीनंतर मिळवला विजय

Tokyo Olympics: मानिका बत्राची कमाल, मोठ्या पिछाडीनंतर मिळवला विजय

भारताची टेबल टेनिस स्टार मानिका बत्रानं (Manika Batra) पहिल्या दोन गेममध्ये पराभूत होऊनही जोरदार कमबॅक करत विजय मिळवला. रविवारी झालेल्या मॅचमध्ये मानिकानं युक्रेनच्या मार्गरेट पेसोत्सकाचा अटीतटीच्या लढतीमध्ये 4-3 असा पराभव केला.

    टोकयो, 25 जुलै: भारताची टेबल टेनिस स्टार मानिका बत्रानं (Manika Batra) पहिल्या दोन गेममध्ये पराभूत होऊनही जोरदार कमबॅक करत विजय मिळवला. रविवारी झालेल्या मॅचमध्ये मानिकानं युक्रेनच्या मार्गरेट पेसोत्सकाचा अटीतटीच्या लढतीमध्ये 4-3 असा पराभव केला. मानिकाला या मॅचमध्ये सूर सापडण्यात वेळ लागला. मात्र योग्य वेळी तिनं खेळ उंचावला. 57 मिनिटं चाललेल्या लढतीमध्ये मानिकानं 4-11, 4-11, 11-7, 12-10, 8-11, 11-5 आणि  11-7 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिले दोन गेम गमावल्यानंतर मानिका दबावात होती. 20 वी मानंकित युक्रेनची खेळाडू ही मॅच जिंकणार असंच वाटत होतं. मानिकाकडं तिच्या फोरहँड आणि स्मॅशला काहीही उत्तर नव्हते. ती तिसऱ्या गेममध्ये देखील मागे पडली होती. पण, तिने तो गेम 6-6 असा बरोबरीत आणला. त्यानंतर सतत आघाडी घेत तो गेम 11-7 या फरकानं जिंकला. चौथ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार लढत झाली. मानिकानं  6-4 अशी आघाडी देखील गमावली. दोन्ही खेळाडू अशा बरोबरीत होत्या.  मात्र त्यानंतर मानिकानं खेळ उंचावत चौथा गेम जिंकला आणि 2-2 अशी बरोबरी साधली. पाचव्या गेममध्ये युक्रेनचे पेसोत्सका सुरुवातीला आघाडीवर होती. मानिकानं पिछाडी भरुन काढत 8-8 अशी बरोबरी साधली. त्या बरोबरीनंतर पेसोत्सकानं पुन्हा एकदा तीन पॉईंट्स कमावत पाचवा गेम जिंकला. मानिका सहाव्या गेममध्येही 2-5 अशी पिछाडीवर होती. या पिछाडीनंतरही तिनं जिद्द न सोडता गेम जिंकला. सातव्या आणि अखेरच्या गेममध्येही मानिकाचा धडाका कायम होता. तिने शेवटचा गेम 11-7 असा जिंकत एका थरारक विजयाची नोंद केली. Tokyo Olympics: ऑलिम्पिकमधून Good News, मेरी कोमचा विजयी पंच! मानिका कोचशिवाय मैदानात यापूर्वी पहिल्या फेरीतल मॅचच्या दरम्यान मानिकानं  राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला होता. मानिकाचे खासगी सचिव सन्मय परांजपे यांना मैदानात प्रवेश देण्यास आयोजन समितीनं नकार दिला. त्यामुळे मानिका या स्पर्धेत कोचशिवाय खेळत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Olympics 2021

    पुढील बातम्या