• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : फायनलमध्ये पराभव झाला, पण कमलप्रीतने जिंकली भारतीयांची मनं

Tokyo Olympics : फायनलमध्ये पराभव झाला, पण कमलप्रीतने जिंकली भारतीयांची मनं

टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये (Women’s discus throw Final) पोहोचलेली कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur) हिला सोमवारी मेडल जिंकण्यात अपयश आलं.

 • Share this:
  टोकयो, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये (Women’s discus throw Final) पोहोचलेली कमलप्रीत कौर हिला सोमवारी मेडल जिंकण्यात अपयश आलं. फायनलमध्ये ती सहाव्या क्रमांकावर राहिली. कमलप्रीतचा (Kamalpreet Kaur) बेस्ट स्कोअर 63.70 राहिला. फायनलमध्ये पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही अंतर्गत दुखापतीमुळे तिला मेडल मिळवता आलं नाही. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठल्यामुळे कमलप्रीतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी कमलप्रीत कौरचा उल्लेख प्रेरणास्त्रोत असा केला आहे. 'कधीतरी आपण जिंकतो, कधी हरतो. हार्डलक कमलप्रीत. आम्हाला तुझा अभिमान आहे. एवढ्या मोठ्या मंचावर तू भारताचं प्रतिनिधीत्व केलंस आणि आपली सर्वोत्तम कामगिरी केलीस. हा अनुभव तुला भविष्यात नक्कीच मजबूत खेळाडू बनवेल,' असं सचिन तेंडुलकर म्हणाला. 'कमलप्रीत मी तुझा फॅन झालो आहे. मेडल मिळालं नाही, तरी तुझा प्रयत्न उत्कृष्ट होता. तू डिस्कस थ्रोमध्ये हजारो लोकांची रुची वाढवलीस. तुला लवकरच मेडलही मिळेल,' असं ट्वीट सेहवागने केलं. फायनलमध्ये कमलप्रीत दुखापतींसह मैदानात उतरली होती. तिच्या खांद्यावर आणि पायावर पट्टी बांधण्यात आली होती, याशिवाय तिला काही अंतगर्त दुखापत झाल्याचंही कॉमेंटेटर्सनी सांगितलं. पूर्णपणे फिट नसतानाही कमलप्रीतने टॉप-8 मध्ये स्थान पटकावलं. कमलप्रीतने आपला पहिला थ्रो 61.62 मीटर लांब फेकला, पण तिचा दुसरा, चौथा आणि सहावा थ्रो खराब झाला, ती फाऊल करून बसली. तिसऱ्या थ्रोमध्ये तिने 63.70 मीटर थ्रो करून टॉप 6 मध्ये आली. अमेरिकेच्या वॅलरी ऑलमेननं 68.98 मीटर लांब थ्रो करून गोल्ड मेडल पटकावलं. जर्मनीच्या क्रिस्टन पुडनेज 66.86 मीटरचा थ्रो करून सिल्व्हर तर क्युबाच्या येमी परेजने 65.72 मीटरचा थ्रो करून ब्रॉन्झ मेडल मिळवलं.
  Published by:Shreyas
  First published: