मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics: ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे?

Tokyo Olympics: ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे?

भारताची महिला हॉकी टीम मोठ्या स्पर्धेतील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करते, हे आपण यापूर्वी चक दे! इंडिया (Chak De! India) या सिमेमात पाहिलं आहे. या सिनेमातील कथा प्रत्यक्ष मैदानात घडली आहे.

भारताची महिला हॉकी टीम मोठ्या स्पर्धेतील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करते, हे आपण यापूर्वी चक दे! इंडिया (Chak De! India) या सिमेमात पाहिलं आहे. या सिनेमातील कथा प्रत्यक्ष मैदानात घडली आहे.

भारताची महिला हॉकी टीम मोठ्या स्पर्धेतील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करते, हे आपण यापूर्वी चक दे! इंडिया (Chak De! India) या सिमेमात पाहिलं आहे. या सिनेमातील कथा प्रत्यक्ष मैदानात घडली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Women's Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 नं पराभव करत भारतीय टीमनं पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची महिला हॉकी टीम मोठ्या स्पर्धेतील मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करते, हे आपण यापूर्वी चक दे! इंडिया (Chak De! India) या सिमेमात पाहिलं आहे. या सिनेमातील कथा प्रत्यक्ष मैदानात घडली आहे. यामध्ये भारतीय महिला टीमचे कोच शोर्ड मरीने (Sjoerd Marijne) यांचा मोठा वाटा आहे. मरीने हे या स्पर्धेत रिअल लाईफमधील कबीर खान ठरले आहेत.

कसे झाले कबीर खान!

शोर्ड मरीने हे हॉलंडचे असून त्यांना 10 वर्ष हॉकी खेळण्याचा अनुभव आहे. त्यांनी 2018 साली महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली. भारतीय महिला टीम 36 वर्षांनी ऑलिम्पिकसाठी पात्र झाली होती. त्यामुळे टोकयो ऑलिम्पिकमध्ये टीम चांगली कामगिरी करेल ही मुख्य जबाबदारी मरीने यांच्या खांद्यावर होती.

भारतीय महिला टीममध्ये गुणवत्तेला कमी नाही. या गुणवत्तेला योग्य तंत्राची जोड मरीने यांनी दिली. त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन टीमच्या फिटनेसपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागत नाही. त्याचा फटका मॅचमध्ये बसतो. हे लक्षात घेऊन त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. त्याचा परिणाम या ऑलिम्पिकमध्ये दिसतो आहे.

अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असूनही टीममधील जागा जाईल या भीतीनं सराव करत. मरीने यांनी या खेळाडूंना विश्वास दिला. त्यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंना पुरेसा आराम मिळेल तसेच त्यांच्यावर योग्य उपचार होतील यावर भर दिला. त्याचबरोबर त्यांनी खेळाडूंंमधील नेतृत्वगूण त्यांनी विकसीत केले.

'ऑलिम्पक्स डॉट कॉम' या वेबसाईटशी बोलताना भारतीय हॉकी टीममधील खेळाडू गुरजीत कौरनं (Gurjit Kaur) सांगितलं की, 'मरीन यांनी आमच्यातील नेतृत्त्वगूण विकसीत केले. मैदानात कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर खेळाडूंनीच मार्ग शोधला पाहिजे, असा कानमंत्र मरीन यांनी दिला. त्याचबरोबर आमच्या खेळातील कोणतीही अडचण दूर करण्यासाठी ते सदैव उपलब्ध असतात.' मरीन यांच्या या शिकवणीचा फायदा गुरजीतला झाला. गुरजीतनं केलेल्या एकमेव गोलच्या जोरावरच भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

Tokyo Olympics : चक दे इंडिया! भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय

पुढील सामना अर्जेंटीनाशी

भारतीय महिला  टीमची या स्पर्धेतील सुरुवात खराब झाली. मात्र भारताने शेवटच्या दोन सामन्यात आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. क्वार्टर फायनलमध्ये भारतीय टीमनं तीन वेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत अर्जेंटीनाशी होणार असून हा सामना बुधवारी होणार आहे.

First published:

Tags: Hockey, Olympics 2021