• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : जिंकल्यानंतर गोलपोस्टवर बसला श्रीजेश! जाणून घ्या Viral Photo चे कारण

Tokyo Olympics : जिंकल्यानंतर गोलपोस्टवर बसला श्रीजेश! जाणून घ्या Viral Photo चे कारण

भारताच्या हॉकीमधील विजयानंतर गोलकिपर श्रीजेशचा (PR Sreejesh) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झालाय. या फोटोमध्ये श्रीजेश गोलपोस्टवर बसला आहे.

 • Share this:
  टोकयो, 5 ऑगस्ट : भारतीय हॉकी टीमनं (Indian Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलची कमाई करत इतिहास रचला. सेमी फायनलमध्ये बेल्जियमकडून पराभूत झाल्यानंतर भारताची ब्रॉन्झ मेडलसाठी जर्मनी विरुद्ध लढत होती. भारतानं हा सामना 5-4 या फरकानं जिंकला. त्यामुळे 1980 नंतर हॉकीमध्ये पहिल्यांदाच भारताला मेडल मिळाले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे टोकयोमधील सर्व भारतीय खेळाडूंसह संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. भारताच्या या कामगिरीमध्ये माजी कॅप्टन आणि गोलकिपर पीआर श्रीजेश (PR Sreejesh) याचे मोलाचे योगदान आहे. श्रीजेशनं 2000 साली हॉकी खेळण्यास सुरुवात केली. तब्बल 21 वर्षांनी ऑलिम्पिक मेडलचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. टीममधील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या श्रीजेशनं संपूर्ण स्पर्धेत अनेक गोल वाचवले. जर्मनी विरुद्धच्या सामन्यातही शेवटच्या काही मिनिटात दोन पेनल्टी कॉर्नर वाचवत त्यानं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या कामगिरीमुळे श्रीजेशचा भारताची 'अभेद्य भिंत' या शब्दामध्ये गौरव होत आहे. भारताच्या या विजयानंतर श्रीजेशचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झालाय. या फोटोमध्ये श्रीजेश गोलपोस्टवर बसला आहे. श्रीजेशनं 'आज तक' शी बोलताना या मागील कारण सांगितलं आहे. 'माझ्यासाठी गोलपोस्ट सर्व काही आहे. मी माझं सर्व आयुष्य गोलपोस्टवरच घालवलं आहे. या गोलपोस्टचा मी मालक आहे. हे मला यामधून दाखावायचं होतं.' असं कारण श्रीजेशनं सांगितलं आहे. Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी कुमारला आज गोल्डन चान्स, रवीची आई म्हणाली... जर्मनीविरुद्धच्या मॅचपूर्वी आम्ही कोणत्याही दबावात नव्हतो. आम्ही नैसर्गिक खेळ करण्याचं ठरवलं. मेडलबाबत जास्त विचार न करता आम्ही शेवटपर्यंत आमचा सर्वोत्तम खेळ केला, अशी प्रतिक्रिया हॉकी टीमचा कॅप्टन मनप्रीत सिंहनं व्यक्त केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: