• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics: भारताला बॉक्सिंगमध्ये मोठा धक्का, नंबर 1 बॉक्सर पराभूत

Tokyo Olympics: भारताला बॉक्सिंगमध्ये मोठा धक्का, नंबर 1 बॉक्सर पराभूत

टोकोयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. फ्लाईटवेट गटातील वर्ल्ड नंबर 1 बॉक्सर अमित पंघालला (Amit Panghal) क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आलंय.

 • Share this:
  टोकयो, 31 जुलै :  टोकोयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. फ्लाईटवेट गटातील वर्ल्ड नंबर 1 बॉक्सर अमित पंघालला (Amit Panghal) क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आलंय. अमितकडून पदकाची मोठी अपेक्षा होती. प्री क्वार्टर फायनलमध्ये कोलंबियाच्या हर्नी मार्टिनेजनं त्याचा 4-1 नं पराभव केला. भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगोहन (Lovlina Borgohain) हिनं शुक्रवारी एक मेडल नक्की केलं आहे. त्यानंतर पुरुषांच्या गटातून अमितवर मोठी आशा होती. अमितनं पहिल्या राऊंडमध्ये जोरदार सुरुवात केली होती. कोलंबियाच्या बॉक्सरनं थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, अमितनं जोरदार बॅकहँड पंच लगावत त्याला संधी दिली नाही. पहिल्या राऊंडमध्ये अमितचंच वर्चस्व होतं. पाच पैकी चार रेफ्रींनी अमितच्या बाजूनं निर्णय दिला. दुसऱ्या राऊंडमध्ये कोलंबियन बॉक्सरनं पुनरागमन केलं. त्यानं अमितच्या चेहऱ्यावर काही चांगले पंच लगावले. कोलंबियाच्या मार्टिनेजनं तो राऊंड 4-1 नं जिंकला.  तिसऱ्या राऊंडमध्ये मार्टिनेजनं बॅकफुटवर खेळ केला. रेफ्रीनी त्याला हाथ बाजूला करण्याची सूचनाही केली. त्यानंतर अमितनं क्रॉस पंच लगावण्याचा प्रयत्न केला. ऑलिंपिक पदकासाठी किती भयंकर मेहनत घेतात खेळाडू पाहा; घामच नाही तर अक्षरशः रक्तही गाळतात मार्टिनेजनं स्वीप करत राईट हूक लगावला. त्यामुळे अमितचा माऊथ गार्ड बाहेर आला. या राऊंडमध्ये अमितचा जास्त भर हा मार्टिनेजचे पंच ब्लॉक करण्यावर होता. मार्टिनेजनं त्याच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. तिसऱ्या राऊंडच्या नंतर पाचही रेफ्रींनी मार्टिनेजच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे अमितचे आव्हान संपुष्टात आले.
  Published by:News18 Desk
  First published: