मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics 2020 : कुस्तीमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न भंग, बजरंग पुनिया सेमी फायनलमध्ये पराभूत

Tokyo Olympics 2020 : कुस्तीमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न भंग, बजरंग पुनिया सेमी फायनलमध्ये पराभूत

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) सेमी फायनलमध्ये पराभूत झाला. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 6 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) सेमी फायनलमध्ये पराभूत झाला. 65 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियासमोरनं अझरबैजानाच्या हाजी अलियेव्हचे (Haji Aliyev) आव्हान होते. हाजीनं बजरंगचा 12-5 या फरकानं पराभव केला.  हाजीनं 2014 च्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवले असून तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.

सेमी फायनलमध्ये दोघांनीही सुरुवात सावध केली. पहिल्या मिनिटामध्ये कुणालाही पॉईंट मिळाला नाही. बजरंगनं ही कोंडी फोडत पहिला पॉईंट मिळवला. पण त्यानंतर लगेच हाजीनं झटपट चार पॉईंट्स घेत बजरंगवर आघाडी घेतली. पहिल्या राऊंडनंतर हाजी 4-1 ने आघाडीवर होता.

हाजीनं दुसऱ्या राऊंडमध्ये आक्रमक सुरुवात करत 4 झटपट पॉईंट कमावले. बजरंगनं त्यानंतर जोरदार प्रतिकार करत आणखी दोन पाईंट्स मिळवले. पण हाजीनं भक्कम बचाव करत आणखी एक पॉईंट मिळवला. बजरंगनं आणखी दोन पॉईंट्स मिळवत विजयाची आशा कायम ठेवली होती. तीन सेकंद बाकी असताना बजरंगनं रेफ्रींच्या निर्णयाला आाव्हान दिलं. पण ते अपील यशस्वी झालं नाही. अखेर हाजीनं 12-5 या मोठ्या फरकानं ही मॅच जिंकली.

बजरंगचा प्रवास

बजरंगनं क्वार्टरफायनलध्ये कझाकस्तानच्या इराणच्या मूर्तझा चेकाचा संघर्षपूर्ण लढतीमध्ये पराभव केला होता. त्या मॅचमध्ये बजरंगनं शेवटच्या काही सेकंदामध्ये बाजी फिरवली. प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला मूर्तझानं पहिल्यांदाच बजरंगचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र बजरंगनं मोठ्या कौशल्यानं त्यातून सुटका केली. बजरंगनं सुरुवातीला बचाव करण्यावर भर दिला. पहिल्या राऊंडनंतर इराणच्या कुस्तीपटूकडं एक पॉईंटची निसटती आघाडी होती. दुसऱ्या राऊंडमध्ये दोघांनी आक्रमक खेळ केला. . बजरंगची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे. मात्र त्यानं यापूर्वी कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.

Tokyo Olympics : कबीर खाननं वाढवला टिमचा उत्साह, पराभवानंतर म्हणाला...

यापूर्वी भारताच्या रवी कुमार दहियानं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. तर दीपक पुनियाचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यानंतर भारताचे मोठे आशास्थान असलेला बजरंग पुनियाला देखील फायनल गाठण्यात अपयश आले. बजरंगला गोल्ड मेडल मिळवण्यात अपयश आले असले तरी त्याची ब्रॉन्झ मेडल जिंकण्याची आशा आणखी जिवंत आहे.

First published:

Tags: Olympics 2021