मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : घरी परताच रडू लागली भारतीय खेळाडू, कारण समजल्यावर सर्वांना अश्रू अनावर

Tokyo Olympics : घरी परताच रडू लागली भारतीय खेळाडू, कारण समजल्यावर सर्वांना अश्रू अनावर

टोकयो ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics 2020) आता समाप्त झाली असून भारतीय खेळाडू घरी परतत आहेत. धनलक्ष्मी सेकर (Dhanalakshmi Sekar) या खेळाडूचं घरी भव्य स्वागत करण्यात आलं. त्या कार्यक्रमात एक बातमी समजल्यानं धनलक्ष्मी धाय मोकलून रडू लागली.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक स्पर्धा  (Tokyo Olympics 2020) आता समाप्त झाली असून भारतीय खेळाडू घरी परतत आहेत. या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सुभा व्यंकटेशन आणि धनलक्ष्मी सेकर (Dhanalakshmi Sekar) या अ‍ॅथलिट टोकयोमधून घरी परतल्या आहेत. त्या तामिळनाडूतील तिरुचीमध्ये असलेल्या त्यांच्या घरी गेल्या. त्यावेळी दोघींचे भव्य स्वागत करण्यात आले. या स्वागत कार्यक्रमात धनलक्ष्मी गुडघ्यावर डोकं ठेवून धाय मोकलून रडू लागली. तिच्या रडण्याचे कारण समजल्यांतर तिथं उपस्थितीत असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले.

धनलक्ष्मी टोकयोमध्ये असतानाच तिच्या बहिणीचे निधन झाले झाले होते. मात्र, तिचं खेळावरील लक्ष विचलित होऊ नये म्हणून घरच्यांनी ही बातमी तिला सांगितली नव्हती. घरी परतल्यानंतर धनलक्ष्मीला ही माहिती समजताच तिच्यावर दु:खाचा अक्षरश: पहाड कोसळला. तिथं उपस्थित असलेल्या घरच्या मंडळींनी तिला कसंबसं सावरलं. पण या भावुक प्रसंगी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.

बहिणीचा होता मोठा पाठिंबा

धनलक्ष्मी  4×400 मीटर मिक्स रिले टीममध्ये राखीव खेळाडू होती. यावर्षी पटियाळामध्ये झालेल्या निवड चाचणीत तिनं जोरदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे तिची ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीममध्ये निवड झाली. भारताची उगवती खेळाडू म्हणून ती ओळखली जाते. तिच्या या कारकिर्दीमध्ये तिला बहिणीचा नेहमीच मोठा पाठिंबा होता.

IND vs ENG : पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानं टीम इंडियाला फटका, मोजावी लागेल मोठी किंमत!

धनलक्ष्मीचं घरी परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. तिच्या गावातील अनेक मंडळी त्यावेळी उपस्थित होते. धनलक्ष्मी देखील घरी परतल्यानं उत्साहित होती. ती टोकयोमधील अनुभवांबद्दल सर्वांना सांगत होती. त्यावेळी बोलताना तिला बहिणीच्या मत्यूची बातमी समजली. त्यानंतर ती रडू लागली. धनलक्ष्मीची ही शोकाकुल अवस्था पाहून उपस्थित असलेला प्रत्येक जण भावुक झाला होता.

First published:

Tags: Olympics 2021