Home /News /sport /

Tokyo Olympics: दीपिका कुमारीनं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारी पहिली भारतीय तिरंदाज

Tokyo Olympics: दीपिका कुमारीनं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारी पहिली भारतीय तिरंदाज

भारताच्या दीपिका कुमारीनं (Deepika Kumari) रशिया ऑलिम्पिक समितीची (ROC) माजी वर्ल्ड चॅम्पियन सेनिया पेरोवाला (Ksenia Perova) 'शूट ऑफ'मध्ये पराभूत केलं आहे.

    टोकयो, 30 जुलै: भारताच्या दीपिका कुमारीनं (Deepika Kumari) रशिया ऑलिम्पिक समितीची (ROC) माजी वर्ल्ड चॅम्पियन सेनिया पेरोवाला (Ksenia Perova) 'शूट ऑफ'मध्ये पराभूत केलं आहे. दीपिकानं हा विजय मिळवत टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय तिरंदाज बनली आहे. दीपिकानं पहिला सेट 28-25 नं जिंकला. तर दुसरा सेट 26-27 नं गमावला. त्यानंतर दीपिकानं पुनरागमन करत 28-27 या फरकानं दुसरा सेट जिंकला. त्यानंतर चौथा सेट 26-26 असा बरोबरीत सुटला. पाचव्या सेटमध्ये दीपिकाचा 25-28 ने पराभूत झाली. पाच सेटनंतरही हा सामना बरोबरीत सुटल्यानं निकाल शूट ऑफमध्ये लागला. शूट ऑफमध्ये सेनियानं सात पॉईंट्स घेतले. तर दीपिकानं परफेक्ट 10 पॉईंट्सची कमाई करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी दीपिकाची राऊंड 16 मधील लढत देखील जोरदार रंगली होती.अमेरिकेची जेनफिर मुसीनो-फर्नांडिसचा (Jennifer Mucino-Fernandez) दीपिकानं रंगतदार लढतीमध्ये पराभव केला. दीपिकानं जेनफिरचा 6-4 असा पराभव केला. दीपिका हा भारताची अव्वल तिरंदाज असून तिच्याकडून यंदा मेडलची अपेक्षा आहे. Tokyo Olympics: क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला बॉक्सर सतीश कुमार, पदकापासून अवघं एक पाऊल दूर दीपिकाच्या पूर्वी तिचा नवरा अंतनू दासनं दोन वेळा ऑलिम्पिक मेडल तिरंदाजाला पराभूत करत राऊंड 16 मध्ये प्रवेश केला आहे. प्रवीण जाधव आणि तरुणदीप रॉय या भारतीय तिरंदाजांचं आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता भारताच्या आशा दीपिका आणि अंतनू या जोडप्यावर आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Olympic, Olympics 2021, Sports

    पुढील बातम्या