Home /News /sport /

Tokyo Olympics: भारताला मोठा धक्का, दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात

Tokyo Olympics: भारताला मोठा धक्का, दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात

टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) तिरंदाजीमध्ये मेडल मिळवण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाली आहे.

    टोकयो, 30 जुलै: टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) तिरंदाजीमध्ये मेडल मिळवण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाली आहे. दीपिकाचा दक्षिण कोरियाची नेमबाज अन सनने (An San) दीपिकाचा 30-27, 26-24, 26-24 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दक्षिण कोरियाच्या अन सननं टोकोयो ऑलिम्पिकमध्ये 2 गोल्ड मेडल यापूर्वीच जिंकले आहेत.महिलांच्या सांघिक स्पर्धेत आणि मिक्स टीम इव्हेंटमध्ये तिने गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्याचबरोबर एक नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड देखील नोंदवला आहे. त्यामुळे दीपिकाला क्वार्टर फायनलमध्ये मोठे आव्हान होते. आन सननं पहिल्या सेटमध्ये जोरदार कामगिरी करत परफेक्ट 30 पॉईंटची कमाई केली.दीपिकानं 7,10,10 असे 27 पॉईंट्स मिळवले. पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेटमध्ये दीपिकानं आणखी निराशा केली. पुढील दोन्ही सेट दीपिकानं 24-26, 24-26 या फरकानं गमावले.दीपिकाच्या पराभवानंतर भारताच्या आता सर्व आशा अतनू दासवर शिल्लक आहेत. Tokyo Olympics: महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम दीपिकानं रचला इतिहास दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात आले असले तरी ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळणारी ती पहिली महिला ठरली.  रशिया ऑलिम्पिक समितीची (ROC) माजी वर्ल्ड चॅम्पियन सेनिया पेरोवाला (Ksenia Perova) 'शूट ऑफ'मध्ये पराभूत केलं. पाच सेटनंतरही हा सामना बरोबरीत सुटल्यानं निकाल शूट ऑफमध्ये लागला. शूट ऑफमध्ये सेनियानं सात पॉईंट्स घेतले. तर दीपिकानं परफेक्ट 10 पॉईंट्सची कमाई करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Olympics 2021

    पुढील बातम्या