• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल

Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल

भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला.

 • Share this:
  टोकयो, 5 ऑगस्ट : भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक मेडलची 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या मॅचमध्ये भारतानं जर्मनीचा 5 -4 ने पराभव केला. भारताने 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिकमध्ये हॉकीत मेडल मिळवले आहे. या मॅचमध्ये जर्मनीनं आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीच्या ऊरजनं फिल्ड गोल करत  1-0 नं आघाडी मिळवली. भारताला 5 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र रुपिंदर पाल सिंह गोल करण्यात अपयशी ठरला. दोन्ही टीम  सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत होत्या. सातव्या मिनिटाला जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न गोलकिपर श्रीजेशनं उधळला. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीकडं 1-0 अशी आघाडी होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 5 गोल जर्मनीच्या टीमनं 2008 आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. तर 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. भारतीय टीमला 41 वर्षांपासून ऑलिम्पिक मेडलची प्रतीक्षा आहे. या मोठ्या फरकानंतरही भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये जोरदार खेळ केला. सिमरनजीत सिंहनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर 24 व्या मिनिटाला जर्मनीच्या निकोलस वेलननं गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनीच जर्मनीनं आणखी एक गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. भारतीय टीमनं 2 गोलच्या पिछाडीनंतरही जिद्द सोडली नाही. हार्दिक सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी 2-3 नं कमी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी भारतीय टीमनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये तीन मिनिटात दोन गोल करत बरोबरी साधली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने जोरदार सुरुवात केली. भारताकडून 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत मॅचमध्ये पहिल्यांदाच टीमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 5 मिनिटांनीच सिमरनजीत सिंहनं गोल करत 5-3 अशी आघाडी घेतली. हा भारताचा मॅचमधील सलग चौथा गोल होता. त्यानंतर जर्मनीनं काही पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्या पेनल्टीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले. IND vs ENG : पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडला झटपट गुंडाळल्यानंतर भक्कम सुरूवात चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या बचाव फळीतील चुकांचा फायदा घेत जर्मनीनं चौथा गेला. जर्मनीकडून लुकासनं हा गोल केला. त्यानंतर मनदीप सिंहला गोल करण्याची एक संधी साधता आली नाही. मात्र भारतानं अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत ऑलिम्पिक मेडलवर शिक्कामोर्तब केलं.
  Published by:News18 Desk
  First published: