टोकयो, 31 जुलै : भारतीय महिला हॉकी टीमनं (Indian Womens Hockey Team) 'करो वा मरो' लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 4-3 ने पराभव केला आहे. भारताकडून वंदना कटारियानं (Vandana Katariya) तीन गोल केले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रिक करणारी वंदना ही पहिली भारतीय महिला हॉकीपटू ठरली आहे. भारताकडून नेहा गोयलनं एक गोल केला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला क्वार्टर 1-1 ने बरोबरीत सुटला. भारताच्या वंदना कटारियाीनं चौथ्या मिनिटालाच गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली होती. मात्र पहिल्या क्वार्टरमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये आफ्रिकेनं बरोबरी साधली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा वंदनानं आघाडी मिळवून दिली आणि नंतर शेवटच्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेनं बरोबरी केली.
तिसऱ्या क्वार्टरमध्येही सामना 3-3 ने बरोबरीत होता. या क्वार्टरमध्ये भारताकडून नेहानं गोल केला. त्यानंतर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात वंदनानं मॅचमधील तिसरा आणि भारताचा चौथा गोल केला. खेळ संपण्यास 7 मिनिटं बाकी असताना वंदनानं हा गोल केला. भारताने ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत हा सामना 4-3 ने जिंकला.
Indian women's hockey team beats South Africa 4-3
All 👀 now on Ireland-Great Britain game in the evening. If 🇮🇪 lose or draw, 🇮🇳 is into QF.#Tokyo2020 | #TeamIndia | #Hockey pic.twitter.com/diEg4Oeynl — The SportsGram India (@SportsgramIndia) July 31, 2021
Tokyo Olympics : कमलजीत कौरनं रचला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये धडक
भारताला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक होते. आता आयर्लंड विरुद्ध ब्रिटन या लढतीवर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. ही लढत बरोबरीत सुटली किंवा ब्रिटननं आयर्लंडचा पराभव केला तर भारतीय टीम क्वार्टर फायनलसाठी पात्र होईल. मात्र आयर्लंडनं हा सामना जिंकल्यास भारतीय महिला हॉकी टीमचे आव्हान स्पर्धेतून संपुष्टात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Olympics 2021