टोकयो, 30 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं यजमान जपानचा 5 - 3 पराभव केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकणाऱ्या अर्जेंटीनाचा पराभव केल्यानंतर भारतीय टीमला चांगला सूर सापडला आहे. जपान विरुद्धच्या लढतीमध्ये तो आत्मविश्वास दिसला. भारताचा ग्रुप ए मधील हा शेवटचा सामना होता. पाच पैकी चार सामने जिंकत भारतीय हॉकी टीमनं मोठ्या दिमाखात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
भारताकडून हरनप्रीतनं पहिला गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. टोकयो ऑलिम्पिकमधील हरनप्रीतचा हा चौथा गोल आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुरजंत सिंहनं गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानच्या टनाकानं गोलकिपर श्रीजेशला चुकवत पहिला गोल केला. दुसऱ्या क्वार्टरनंतर भारताकडं 2-1 अशी आघाडी होती. या क्वार्टरमध्ये जपाननं जोरदार खेळ करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण, भारताच्या बचाव फळीनं त्यांचे हल्ले परतवून लावले.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपाननं आणखी एक गोल करत मॅचमध्ये 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर थोड्याच वेळात शमशेर सिंहनं गोल करत भारताला 3-2 नं आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरनंतर भारताकडं 3-2 अशी आघाडी कायम होती. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतानं आणखी आक्रमक खेळ करत जपानवर आणखी दोन गोल केले. जपाननं शेवटच्या काही मिनिटात गोल करत ही आघाडी एका गोलनं कमी केली.
Indian men's hockey team beats Japan 5-3 in their last group game. 4 wins and a loss for India during the group stage 🇮🇳🏑
Up Next: Quarter-finals on Sunday#TeamIndia | #Tokyo2020 | #Hockey pic.twitter.com/UtLZO8iACk — The SportsGram India (@SportsgramIndia) July 30, 2021
अनुष्कानं केलं राहुल-आथियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब! Photo शेअर करत म्हणाली...
अर्जेंटीनाचा केला होता पराभव
भारतीय हॉकी टीमने त्यांच्या चौथ्या सामन्यात 2016 रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाच्या संघाचा 3-1 ने पराभव केला. भारतीय संघाने टोकयो ऑलिम्पिकमध्ये न्यूझीलंड, स्पेन, अर्जेंटिना आणि यजमान जपानविरोधात विजय मिळवला आहे. केवळ ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं आहे. आता भारताची क्वार्टर फायनलमधील लढत रविवारी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021