टोकयो, 5 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) संपण्यासाठी आता काही दिवसांचा कालावधी उरला आहे.भारतीय टीमनं यावेळी वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि हॉकी या चार खेळात मेडल जिंकले आहे. तर रवी कुमार दहिया (Ravi Kumar Dahiya) कुस्तीमध्ये फायनलला गेल्यानं पाचवं मेडल नक्की झालंय. उरलेल्या काही दिवसांमध्येही भारताला मेडलची आशा आहे. त्यामुळे ही स्पर्धा संपेपर्यंत एकूण मेडलमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
भारताला टोकयो ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) मिळवून दिलं. मीराबाईनं 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत हे मेडल जिंकले. मीराबाईनं स्नॅच गटात 87 आणि क्लीन अँड जर्क गटात 115 किलो वजन उचललं. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी Mirabai Chanu wins Silver Medal) ती पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.
मीराबाई चानूनंतर (Mirabai Chanu) बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला तसंच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 साली ब्रॉन्झ मेडल आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. सिंधूने याआधी रियो ऑलिम्पिकमध्ये 2016 साली सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.
महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. गेल्या नऊ वर्षांत ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगसाठी मिळालेलं हे पहिलं पदक आहे. लवलीना नंतर भारताच्या पुरुष हॉकी टीमनं (Indian Men's Hockey Team) जर्मनीचा पराभव करत ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. भारताला 1980 नंतर पहिल्यांदाच हॉकीमध्ये ऑलिम्पिक मेडल मिळाले आहे.
पाकिस्तानला किती मेडल?
भारताने यावेळी रिओ ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक इतिहासातील मोठे पथक देखील टोकयोला पाठवले. काही भारतीय खेळाडूंना मेडल मिळवण्यात अपयश आले असले तरी त्यांनी चांगली कामगिरी करत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Tokyo Olympics : जिंकल्यानंतर गोलपोस्टवर बसला श्रीजेश! जाणून घ्या Viral Photo चे कारण
त्याचवेळी भारताचा शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानला या ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत एकही मेडल मिळालेलं नाही. पाकिस्तामचे 7 पुरुष आणि 3 महिला असे फक्त 10 खेळाडूच या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. एकूण 6 खेळामध्ये हे खेळाडू सहभागी झाले आहेत. मात्र त्यांची पदक संख्या शून्य आहे. विशेष म्हणजे एकेकाळी हॉकीतील बलाढ्य टीम समजली जाणारी पाकिस्तानची पुरुष टीम यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र देखील होऊ शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021