मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : संतापजनक! ऑलिम्पिक गाजवणाऱ्या खेळाडूच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ

Tokyo Olympics : संतापजनक! ऑलिम्पिक गाजवणाऱ्या खेळाडूच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ

टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमध्ये पराभूत झाली. या पराभानंतर हॉकी टीममधील खेळाडूच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत भारतीय महिला हॉकी टीमनं ऐतिहासिक कामगिरी करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारतीय  महिला हॉकी टीमच्या इतिहासातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. त्यानंतर सेमी फायनलमध्ये भारताचा अर्जेंटींनाकडून 1-2 असा निसटता पराभव झाला. भारतीय टीमनं मॅच गमावली असली तरी झुंजार खेळानं सर्व जगाचं मन जिंकलं आहे. मात्र त्याचवेळी भारतीय महिला टीमच्या नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

महिला टीमची सदस्य वंदना कटारियाच्या भावानं याबाबत हरीद्वार पोलिसांकडं तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आयपीसी कलम 504  आणि एससी/एसटी एक्टच्या अंतर्गत कलम 3 नुसार प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. सेमी फायनलमधील पराभवानंतर वंदनाच्या कुटुंबीयांना शिवीगाळ झाल्याची तक्रार आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पराभवानंतर फोडले फटाके

यापूर्वी भारताच्या पराभवानंतर बुधवारी वंदनाच्या घराजवळ फटाके फोडण्यात आले. हरीद्वार जवळ वंदनाचं गाव आहे. त्या गावातील काही तरुणांनी भारताचा पराभव होताच फटके फोडले. वंदनाच्या नातेवाईकांनी त्यांच्या या कृत्यावर आक्षेप घेतला. गावातील अन्य लोकांनीही त्यांना साथ दिली. या प्रकरणात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

भारताचा अर्जेंटीना विरुद्ध सेमी फायनलमध्ये पराभव झाला. मात्र भारतीय महिलांनी त्यांच्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केले आहे. भारतीय महिला टीमनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतानं इतिहास रचला होता.

Tokyo Olympics : भारताला ऑलिम्पिकमध्ये 5 मेडल! पाकिस्तानला किती आहेत माहिती आहे का?

त्यापूर्वी साखळी सामन्यात पहिले तीन सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय टीमनं जोरदार कमबॅक केलं. आधी आयर्लंड आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिलांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारतीय टीमला अजूनही ब्राँझ मेडल मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी ब्रिटनचा पराभव करावा लागेल.

First published:

Tags: Olympics 2021