मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics Golf : अदिती अशोकला इतिहास रचण्याची संधी, गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर

Tokyo Olympics Golf : अदिती अशोकला इतिहास रचण्याची संधी, गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर

भारताची गोल्फर आदिती अशोक (India Golfer Aditi Ashok) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) इतिहास रचण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्यापासून ती एक पाऊल दूर आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 6 ऑगस्ट : भारताची गोल्फर आदिती अशोक (India Golfer Aditi Ashok)  टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) इतिहास रचण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आदिती शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या राऊंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता या स्पर्धेतील चौथा आणि शेवटचा राऊंड शनिवारी होणार आहे. पण खराब हवामानामुळे हा राऊंड झाला नाही तर तिसऱ्या राऊंडपर्यंतच्या स्कोअरच्या आधारावर मेडल दिले जाईल. तसं झालं तर अदितीला सिल्व्हर मेडल मिळेल.

अदितीला गोल्ड मेडल जिंकण्याची देखील संधी आहे. पण हे शनिवारच्या हवामानावर अवलंबून असेल. ऑलिम्पिक इतिहासात चौथ्यांदा गोल्फ या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. अदितीची ही दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये ती 41 व्या क्रमांकावर होती.

आदित्याच्या पुढे सध्या अमेरिकेची गोल्फर नेली कार्डी आहे. तिनं 5 अंडर 198 पॉईंट्सची कमाई केली आहे. कोर्डा अदितीपेक्षा फक्त तीन स्ट्रोकनं आघाडीवर आहे.भारताची दुसरी गोल्फर दीशा डागर तिसऱ्या राऊंडनंतर संयुक्तपणे 51 व्या क्रमांकावर आहे.

भारताला ऑलिम्पिकमध्ये पाच मेडल

भारतानं टोकयो ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत एकूण 5 मेडल जिंकले आहेत. यामध्ये दोन सिलव्हर आणि तीन ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. अदितीसह कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. भारताकडून पहिले सिल्व्हर मेडल मीराबाई चानूने (Mirabai Chanu) 24 ऑगस्ट रोजी जिंकले होते. त्यानंतर पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) यांनी बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले.

Tokyo Olympics : कबीर खाननं वाढवला टिमचा उत्साह, पराभवानंतर म्हणाला...

भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं गुरुवारी ब्रॉन्झ मेडलची कमाई करत भारताला चौथे मेडल मिळवून दिले. त्यानंतर कुस्तीपटू रवी दहियानं भारतासाठी दुसरे सिल्व्हर मेडल जिंकले.

First published:

Tags: Olympics 2021