मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics : 6 कोटी रुपये, क्लास-1 नोकरी, गोल्डमॅन नीरजला काय काय मिळणार?

Tokyo Olympics : 6 कोटी रुपये, क्लास-1 नोकरी, गोल्डमॅन नीरजला काय काय मिळणार?

टोकयो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला गोल्ड मेडल

टोकयो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला गोल्ड मेडल

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे.

टोकयो, 7 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.

नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच हरियाणा सरकारने त्याच्यावर बक्षिसांची खैरात केली आहे.

'नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल. तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,' अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे.

नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावल्यानंतर त्याच्या वडिलांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि माझ्या मुलाने हे स्वप्न पूर्ण केल्यामुळे मी आनंदी आहे. त्याने ज्या प्रकारे मेहनत केली ते बघता त्याला गोल्ड मेडल मिळेल, याचा विश्वास होता, असं नीरजचे वडील म्हणाले. नीरजने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

First published:

Tags: Olympics 2021