मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics मधील गोल्ड मेडल विजेत्या नीरज चोप्राच्या कोचची सुट्टी, मागितला होता 'इतका' पगार

Tokyo Olympics मधील गोल्ड मेडल विजेत्या नीरज चोप्राच्या कोचची सुट्टी, मागितला होता 'इतका' पगार

टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राचे (Neeraj Chpora) कोच उवे हॉन  (Uwe Hohn) जर्मनीला परतले आहेत. त्यांना मुदतवाढ मिळणार नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राचे (Neeraj Chpora) कोच उवे हॉन  (Uwe Hohn) जर्मनीला परतले आहेत. त्यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी ऑलिम्पिक स्पर्धेनंतर समाप्त झाला असून आता त्यांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशी माहिती या विषयावरील एका सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला दिली आहे. होन यांची 2017 साली नियुक्ती करण्यात आली होती. भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या  होन यांना मुदतवाढ न देण्याचं कारण आर्थिक आहे.

होन यांनी आपल्या पगारात 50 टक्के वाढ, करमुक्त उत्पन्न आणि विमानाच्या फर्स्ट क्लास तिकिटांची मागणी केली होती.  हॉन यांना वार्षिक 1 कोटी 9 लाख रुपये इतके वेतन होते. त्याचबरोबर राहणे, खाणे, मेडिकल सुविधा आणि सुट्ट्यांमध्ये घरी जाण्याच्या सुविधाही त्यांना देण्यात आली होती. हॉन यांनी हा करार वाढवण्यापूर्वी त्यामुळे 55 लाखांची वाढ करत 1 कोटी 64 लाख रुपये पगाराची  मागणी केली होती. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई)  ही मागणी व्यावहारिक नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

'साई' संस्थेतील अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघानं होन यांच्या पगारासाठी मोठी रक्कम खर्च केल्यानंतर आणखी एक विदेशी भाला फेक  बायो-मेकॅनिक तज्ज्ञ डॉ. क्लास बार्टोनीट्ज यांची नियुक्ती केली होती. हॉन यांनी त्यांच्या नियुक्तीनंत 2018 मधील आशियाई खेळापर्यंत म्हणजेच जवळपास वर्षभर नीरज चोप्राला प्रशिक्षण दिले.

हॉन यांना सोडून डॉ. क्लासकडून प्रशिक्षण घेण्याचा निर्णय हा नीरज चोप्राचा होता, असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. आपण हॉन यांचा आदर करतो. मात्र जर्मनीच्या या कोचची प्रशिक्षणपद्धत आपल्याला आवडत नाही, असे नीरजने म्हंटले होते.

नीरज चोप्राला मिळालेली बक्षिसाची रक्कमही नाही TAX FREE, मोजावा लागणार इतका कर

हॉननं केली होती संघटनेवर टीका

हॉननं ऑक्टोबर 2020 मध्ये जुन्या अटीवरच करार वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ते अन्य एक भालाफेकपटू शिवपाल सिंहला प्रशिक्षण देत होते. मात्र शिवपाल सिंह ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकला नाही. भारताची  अन्य एक भालाफेकपटू अनू राणीने  देखील हॉन यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास नकार दिला होता. ऑलिम्पिक स्पर्धेच्या एक महिना आधी राष्ट्रीय शिबिरात अपुऱ्या सुविधा असल्याची टीका हॉन यांनी केली होती. ती टिका देखील आणि एएफआय या संस्थांना पटली नाही.

First published:

Tags: Olympics 2021