• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics, Boxing: जखमी असूनही वाघासारखा लढला, सतीश कुमारने जिंकली लाखोंची मनं!

Tokyo Olympics, Boxing: जखमी असूनही वाघासारखा लढला, सतीश कुमारने जिंकली लाखोंची मनं!

Tokyo Olympics: भारतीय बॉक्सर सतीश कुमार ऑलिम्पिकच्या बाहेर झाला आहे. सतीश कुमारला सुपर हेवीवेट कॅटेगरीत क्वार्टर फायनलमध्ये हार पत्करावी लागली आहे

 • Share this:
  टोकयो, 01 ऑगस्ट: भारतीय बॉक्सर सतीश कुमारला (Satish Kumar) टोकयो ऑलिम्पिकच्या  (Tokyo Olympics) क्वार्टर फायनलमध्ये हार पत्करावी लागली आहे. या पराभवानंतर हे निश्चित झालं आहे की भारतीय पुरुष बॉक्सर एकही मेडल या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) मिळवू शकलेले नाहीत. भारताकडून एकूण 5 पुरुष बॉक्सर ऑलिम्पिकसाठी उतरले होते. सतीशला (+91 किलोग्रॅम) क्वार्टर फायनलमध्ये उझ्बेकिस्तानचा बॉक्सर बखोदिर जलोलोवने 5-0 ने हरवले. सतीशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जमैकाच्या रिकार्डो ब्राउनला तगडी टक्कर देत हरवलं होतं. याआधी अमित कुमार प्री-क्वार्टर फायनलमध्ये हार पत्करून बाहेर झाला होता. या सामन्यापूर्वी सतीश कुमार जखमी होता. त्याला टाके बसल्याचीही माहिती आहे. असं असूनही तो मैदानात उतरला होता. तो 2019 च्या वर्ल्‍ड चॅम्पियनशी सामना करणार आहे हे माहित असूनही जखमी अवस्थेत सतीश मैदानात उतरल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिन्ही राउंडमध्ये जलोलोवचं पारडं जड ठरलं. सतीश कुमारच्या आजच्या खेळीमुळे ना ही त्याने केवळ भारतीयांची मनं जिंकली आहेत तर प्रतिस्पर्धी खेळाडूचंही मन त्याने जिंकलं आहे. त्याने जगभरातील नंबर 1 बॉक्सर असणाऱ्या बखोदिर जलोलोवशी दोन हात केले. भारतीय सैन्यातील जवान असणाऱ्या सतीशने यावेळी सैनिकाची जिद्द आणि धैर्य दाखवून दिले आहे. हे वाचा-'करो वा मरो' मॅचमध्ये भारतीय महिला विजयी, स्पर्धेतील आव्हान कायम प्री क्वार्टर सामन्यात त्याच्या कपाळावर आणि हनुवटीवर जखमा झाल्या. त्याला 7 टाके पडले होते. क्वार्टर फायनल फेरीतही त्याच्या खेळण्याबाबत शंका होती, परंतु वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जलोलोवविरुद्ध रिंगमध्ये उतरण्याची परवानगी देण्यात आली. जरी तो 0-5 हरला, पण त्याच्या शौर्यामुळे तो लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आहे. क्वार्टर फायनलमध्ये तिसऱ्या राउंडमध्ये त्याच्या कपाळावर झालेल्या जखमेतून रक्तही येत होतं. सामना संपल्यानंतर त्याच्या प्रतिस्पर्ध्यानेही गळाभेट घेत सतीश कुमारचं कौतुक केलं.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: