मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics: मेरी कोमनं पराभवानंतरही जिंकलं मन, अनुभवी बॉक्सरची कृती वाचून वाटेल अभिमान!

Tokyo Olympics: मेरी कोमनं पराभवानंतरही जिंकलं मन, अनुभवी बॉक्सरची कृती वाचून वाटेल अभिमान!

 भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) 51 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये संघर्षपूर्ण लढतीत पराभव झाला. राऊंड 16 मध्ये झालेल्या लढतीत मेरीचा पराभव झाला असला तरी मेरीनं केलेल्या कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे.

भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) 51 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये संघर्षपूर्ण लढतीत पराभव झाला. राऊंड 16 मध्ये झालेल्या लढतीत मेरीचा पराभव झाला असला तरी मेरीनं केलेल्या कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे.

भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) 51 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये संघर्षपूर्ण लढतीत पराभव झाला. राऊंड 16 मध्ये झालेल्या लढतीत मेरीचा पराभव झाला असला तरी मेरीनं केलेल्या कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे.

टोकयो, 29 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतीय बॉक्सर्सच्या विजयी घौडदौडीला ब्रेक लागला आहे. भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमनं (Mary Kom) 51 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमध्ये संघर्षपूर्ण लढतीत पराभव झाला. राऊंड 16 मध्ये झालेल्या लढतीत मेरीचा पराभव झाला असला तरी मेरीनं केलेल्या कृतीनं सर्वांचं मन जिंकलं आहे.

मेरी कोमची लढत कोलंबियाच्या इनग्रिट वेलेंसियाशी (Ingrit Valencia) होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेल्या वेलेंसियानं आक्रमक सुरुवात करत पहिला राऊंड 4-1 ने जिंकला.  दुसऱ्या राऊंडमध्ये मेरी कोमनं कमबॅक करत तो राऊंड 3-2 ने  जिंकला. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक राऊंडमध्ये दोन्ही बॉक्सर्सनी आपला अनुभव पणाला लावून जोरदार खेळ केला.  मेरी कोम ही वेलसिंयापेक्षा वयानं मोठी आहे. वयाचा अडसर असूनही तिनं जोरदार खेळ केला. अखेर तिसऱ्या राऊंडमध्ये मेरीचा 2-3 असा निसटता पराभव झाला. मेरीनं हा पराभव शांतपणे स्वीकारला. पराभवानंतर वेलेसिंयाची गळाभेट घेत तिचं अभिनंदन केलं. भारताच्या या अनुभवी बॉक्सरचं हे कदाचित शेवटचं ऑलिम्पिक आहे. या ऑलिम्पिकमधून तिनं जोरदार लढत देत एक्झिट घेतली आहे.

भारताचे तीन बॉक्सर क्वार्टर फायनलमध्ये

गुरुवारी सकाळी 91 किलो वजनगटातील बॉक्सिंग स्पर्धेचा (Boxing matches Olympics) फायनल-16 राऊंड पार पडला. यात भारताच्या सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला नमवत क्वार्टर फायनलमध्ये (Satish Kumar Olympics) प्रवेश केला आहे. 4-1 अशा मोठ्या फरकाने सतीशने हा सामना खिशात घातला. पहिला राऊंड 5-0 ने जिंकल्यानंतर, सतीशने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 4-1 ने विजय मिळवला. सतीशचा पुढचा सामना उझबेकिस्तानचा खेळाडू बखोदिर जलोलोव (Bakhodir Jalolov) याच्याविरुद्ध होणार आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात राहणारा सतीश कुमार पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये सतीश हा भारताचा सर्वात जास्त वजनी गटात खेळणारा बॉक्सर आहे. भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या सतीशने एशियन गेम्स 2014 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तसेच, सतीशने एशियन चॅम्पियनशिप 2015 आणि 2019 मध्ये कांस्य पदक मिळवले आहे. सतीशने 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं आहे.

Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान, मिळणार 3 कोटीपर्यंतचा कॅश रिवॉर्ड

दरम्यान, टोकयो ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनल्समध्ये पोहोचलेला सतीश हा भारताचा तिसरा बॉक्सर आहे. यापूर्वी पूजा राणी (Pooja Rani) आणि लवलीन या दोन महिला बॉक्सर्स क्वार्टर फायनल्समध्ये पोहोचल्या आहेत

First published:

Tags: Olympic, Olympics 2021, Sports