मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : वर्ल्ड कप विजेता बॉलर हॉकीतील यशानंतर भावुक, श्रीजेशला केला इमोशनल मेसेज! VIDEO

Tokyo Olympics : वर्ल्ड कप विजेता बॉलर हॉकीतील यशानंतर भावुक, श्रीजेशला केला इमोशनल मेसेज! VIDEO

भारतीय हॉकी टीमच्या या यशात (Indian Mens Hockey Team) गोलकिपर पीआर श्रीजेशचं (PR Sreejesh) मोलाचं योगदान होतं. श्रीजेशचं या यशाबद्दल वर्ल्ड कप विजेत्या बॉलरनं इमोशनल पोस्ट लिहून अभिनंदन केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 7 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय हॉकी टीमनं (Indian Mens Hockey Team) ब्रॉन्झ मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. भारतीय टीमच्या या यशात गोलकिपर पीआर श्रीजेशचं (PR Sreejesh) मोलाचं योगदान होतं. या यशानंतर श्रीजेश त्याच्या केरळ राज्यात हिरो बनला आहे. श्रीजेशपूर्वी टीम इंडियाचा फास्ट बॉलर एस श्रीसंत (S Sreesanth) देखील केरळचा हिरो बनला होता. टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा तो सदस्य होता.  मात्र त्याचं नाव आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये (IPL Spot Fixing) अडकलं. त्यानंतर त्याची टीम इंडियातून हकालपट्टी झाली.

हॉकी टीमला मिळालेल्या यशानंतर श्रीशांत भावुक झाला असून त्यानं एक इमोशनल मेसेज शेअर करत श्रीजेशचे आभार मानले आहेत. या यशानं माझं नाव पुन्हा एकदा जगासमोर  आणलेस  त्याबद्दल धन्यवाद, असं श्रीशांतनं म्हटंलं आहे.

श्रीशांतनं एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यानं एक टी शर्ट घातला आहे. त्याच्या मागे त्याच नावं लिहलंय. पण, ते नाव अंधुक आहे. त्यावर श्रीशंतनं लिहलंय की , 'या टी शर्टवरील माझं नाव आता हळू-हळू नाहीसं होत आहे. माझं मन, माझं शरीर आणि विशेषत: आत्मा मला पुढे जाण्याची प्रेरणा देत आहे. पुढील वाटचाल करण्यासाठी मला तुमच्या सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. '

तुझा अभिमान आहे मीराबाई! 'त्या' उपकारांची केली अशी परतफेड, सिल्व्हर गर्लने ठेवली मदतीची जाणीव

श्रीजेशच्या उत्तराची प्रतीक्षा

श्रीसंत पुढे म्हणाला की, 'मी श्रीजेशला मेसेज केला असून त्याच्या उत्तराची वाट पाहात आहे. तो सध्या 33 वर्षांचा आहे. त्यानं स्वत:ला फिट ठेवलं तर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करु शकतो.' श्रीसंत सध्या 38 वर्षांचा असून तो सध्या टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने यावर्षी केरळकडून देशांतर्गत क्रिकेट देखील खेळले आहे. मुख्य स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन क्लब क्रिकेट खेळण्याचे संकेत श्रीसंतनं काही दिवसांपूर्वी दिले आहेत.

First published:

Tags: Olympics 2021