• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics : हॉकीतील भारताच्या विजयाचं वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा इमोशनल VIDEO

Tokyo Olympics : हॉकीतील भारताच्या विजयाचं वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा इमोशनल VIDEO

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या पुरुष हॉकी (Indian Men's Hockey Team) टीमनं रविवारी इतिहास घडवला. या सामन्याची Live कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंटेटरना भारताच्या विजयानंतर रडू आवरले नाही.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या पुरुष हॉकी (Indian Men's Hockey Team) टीमनं रविवारी इतिहास घडवला. भारतानं क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा 3-1 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. 1972 नंतर पहिल्यांदाच भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिक सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय टीमनं 49 वर्षांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतामध्ये ऑलिम्पिक सामन्यांचं Live प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्सवर करण्यात येत आहे. सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय हे दोघं जण रविवारच्या मॅचची हिंदी कॉमेंट्री करत होते. रविवारी मॅच संपण्याची शिट्टी वाजली आणि गेल्या 49 वर्षांपासून भारतीय हॉकी फॅन्सनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. भारताची टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणी सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय हे दोघे जणं अक्षरश: आनंदानं रडू लागले. या दोघांनाही Live कॉमेंट्रीचा मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी देखील अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक सामन्यांची कॉमेंट्री केली आहे. तरीही रविवारचा विजय हा त्यांच्यासाठी खूपच इमोशनल होता. भारताच्या हॉकी टीमनं 49 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साखळी सामन्यामधे मोठा पराभव झाल्यानंतर भारत इथवर मजल मारेल अशी कल्पना खूप कमी जणांनी केली होती. सामना जिंकल्यानंतर कॉमेंट्री करताना सुनील तनेजा आणि सिद्धार्थ पांडेय या दोघांनाही अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या या इमोशनल कॉमेंट्रीचा व्हिडीओ आता व्हायरल (Video Viral) झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूसोबत खाणार आईसक्रीम, कारण... भारताकडून रविवारच्या सामन्यात दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 1-1 गोल केला, तर ब्रिटनकडून एकमात्र गोल वॉर्डने केला. 3 ऑगस्टला भारत आणि बेल्जियम यांच्यात सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. बेल्जियमने क्वार्टर फायनलमध्ये स्पेनचा 3-1 ने पराभव केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये सामना रंगेल.
  Published by:News18 Desk
  First published: