मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics : नीरज चोप्राला धोनीच्या टीमचा सलाम, मोठ्या बक्षिसासह करणार खास सन्मान

Tokyo Olympics : नीरज चोप्राला धोनीच्या टीमचा सलाम, मोठ्या बक्षिसासह करणार खास सन्मान

नीरज चोप्राचं बायोपिकवर उत्तर

नीरज चोप्राचं बायोपिकवर उत्तर

टोकयो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics 2020) नीरज चोप्रा (Neeraj Chpora) या नव्या सुपरस्टारचा उदय झाला आहे. गोल्डन बॉय नीरजचा महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल टीमनं खास सन्मान करण्याची घोषणा केली आहे.

मुंबई, 8 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics 2020) नीरज चोप्रा (Neeraj Chpora) या नव्या सुपरस्टारचा उदय झाला आहे. भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावत नीरजनं इतिहास घडवला आहे. 121 वर्षांच्या इतिहासात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज हा पहिला भारतीय अ‍ॅथलिट ठरला आहे. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्द महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आयपीएल टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) त्याचा खास सन्मान करण्याचं ठरवलं आहे.

धोनी कॅप्टन असलेल्या सीएसकेच्या टीमकडून नीरज चोप्राला 1 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. 'एक भारतीय म्हणून आम्हाला नीरज चोप्राचा अभिमान आहे. टोकयो ऑलिम्पिकमधील त्याच्या खेळानं लाखो भारतीयांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे ते आता खेळातील या सर्वोच्च स्टेजवर सर्वोच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न करतील. नीरजचा सन्मान करण्यासाीठी 8758 नंबरची विशेष जर्सी देखील त्यासा सीएसकेकडून देण्यात येणार आहे.' अशी माहिती सीएसकेच्या प्रवक्त्यानं दिली आहे, नीरज चोप्रानं टोकयो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर थ्रो करत गोल्ड मेडल जिंकले होते.

बीसीसीआयनं उघडली तिजोरी

भालाफेकमध्ये (Men's javelin throw) गोल्ड मेडल पटकावणाऱ्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra) बीसीसीआय (BCCI) एक कोटी रुपये देणार आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या भारतीयांनाही बीसीसीआयनं बक्षीस जाहीर केलं आहे.

IND vs ENG : बुमराहनं केली दोन दिग्गजांची बरोबरी, 'ही' कामगिरी करणारा तिसरा भारतीय

सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या मीराबाई चानू (Mirabai Chanu) आणि पैलवान रवी दहिया (Ravi Dahiya) यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये मिळणार आहेत, तर पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia), बॉक्सर लवलीना बोरगोहन (Lovlina Borgohain) आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) यांना प्रत्येकी 25-25 लाख रुपये मिळणार आहेत. भारताच्या पुरुष हॉकी टीमने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं, त्यांना 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी या पुरस्काराची घोषणा केली

First published:
top videos

    Tags: Csk, MS Dhoni, Olympics 2021