टोकयो, 31 जुलै : टोकयोमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) मेडल जिंकण्यासाठी सर्वच खेळाडू जोरदार प्रयत्न करत आहे. क्रीडा क्षेत्रातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत मेडल जिंकण्यासाठी खेळाडू अनेक वर्षांपासून मेहनत घेतात. खेळाच्या दरम्यान काही डावपेचांसह मैदानात उतरतात. मात्र, बऱ्याचदा सामना सुरु असताना त्यांनी केलेली युक्ती ही निर्णायक ठरते. ऑस्ट्रेलियाच्या जेसिका फॉक्स (Jessica Fox) या खेळाडूच्या बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. जेसिकानं चक्क कंडोमच्या मदतीनं या ऑलिम्पिमध्ये मेडल जिंकलं आहे.
काय आहे प्रकार?
ऑस्ट्रेलियाच्या जेसिका फोस्कसाठी हे ऑलिम्पिक भलकतंच यशस्वी ठरलं आहे. जेसिकानं कायकिंग स्पर्धेत एक गोल्ड आणि एक ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे. या स्पर्धेच्या वेळी तिचं जहाज बिघडलं होतं. तेव्हा तिच्या क्रू मेंबरनं कंडोमच्या मदतीनं ते जहाज दुरुस्त केल. त्यानंतर जेसिकानं मेडलची कमाई केली.
जेसिकानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये जेसिकासोबत एक क्रू मेंबर बोट दुरुस्त करत आहे. यावेळी त्यांनी बोट दुरुस्त करण्यासाठी कंडोमचा वापर केला आहे.
Previene ETS y también ayuda a ganar medallas olímpicas. #Tokyo2020
Jessica Fox #AUS arregló su kayak con un preservativo y GANÓ EL en #CanoeSlalom pic.twitter.com/QrTX1YL8k0 — Andrés Yossen (@FinoYossen) July 30, 2021
Tokyo Olympics : तिरंदाजीतील भारतीय जोडपे आऊट, पत्नी दीपिकानंतर अतनूही पराभूत
फ्रान्समध्ये जन्म झालेल्या जेसिकानं वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत आजवर 10 गोल्ड मेडलची कमाई केली आहे. तिचे आई-वडिल रिचर्ड आणि मारियम यांनीही याच प्रकार ऑलिम्पिक स्पर्धेत यापूर्वी भाग घेतला आहे. तिची आई सध्या ऑस्ट्रेलियाच्या कायनिंग टीमची मॅनेजर देखील आहे. जेसिकानं या ऑलिम्पकमध्ये अपेक्षेप्रमाणे मेडलची कमाई केली. मात्र मेडलपेक्षा तिची चर्चा जिंकण्यासाठी कंडोमचा वापर केल्यानं झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021