Home /News /sport /

Tokyo Olympics : अनू मलिकवर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप! वाचा काय आहे प्रकरण

Tokyo Olympics : अनू मलिकवर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप! वाचा काय आहे प्रकरण

टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत इस्रायलच्या (Israel) आर्तेम डोल्गोपायतनं ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले. या गोल्ड मेडलनंतर भारतीय संगीतकार अनू मलिक (Anu malik) यांचीच सोशल मीडियावर चर्चा आहे.

    मुंबई, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत इस्रायलच्या (Israel) आर्तेम डोल्गोपायतनं ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले. इस्रायलचे हे ऑलिम्पिक इतिहासातील दुसरेच गोल्ड मेडल आहे. इस्रायलनं गोल्ड मेडल जिंकलं असलं तरी सोशल मीडियावर मात्र भारतीय संगीतकार अनू मलिक (Anu malik) यांचीच चर्चा आहे. मलिक सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक देताना इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले. त्यानंतर अनू मलिक यांच्यावर या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप होत आहे. इस्रायलचे राष्ट्रगीताची धून  1996 साली प्रदर्शित झालेल्या दिलजले सिनेमातील 'मेरा मुल्क मेरा देश' या गाण्याच्या धूनशी साधर्म्य असलेली आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत असून अनू मलिकवर ही धून चोरल्याचा आरोप होत आहे. Tokyo Olympics : चक दे इंडिया! भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय इस्रायलच्या डोल्गोपयातनं स्पेनच्या रेडर्ली जपाटाकोचा टायब्रेकरमध्ये पराभव करत फ्लोअर एक्सरसाइज प्रकारातील गोल्ड मेडल जिंकले. फायनलमध्ये इस्रायल आणि जपान या दोन्ही देशांच्या खेळाडूंना 14.933 पॉईंट्स मिळाले होते. समान पॉईंट्स असूनही इस्रायलच्या खेळाडूला गोल्ड मिळाले. याचे कारण म्हणजे जपानपेक्षा इस्रायलच्या खेळाडूंनी अवघड प्रयत्न केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Olympics 2021

    पुढील बातम्या