मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : नीरज चोप्राला XUV700 भेट देणार का? आनंद महिंद्रांनी दिलं 'हे' उत्तर

Tokyo Olympics : नीरज चोप्राला XUV700 भेट देणार का? आनंद महिंद्रांनी दिलं 'हे' उत्तर

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. या यशानंतर नीरजला XUV700 भेट देणार का? असा प्रश्न उद्योगपती आनंद महिंद्रा यांना विचारण्यात आला होता.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 8 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या नीरज चोप्रानं गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यानं दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकत गोल्ड मेडलवर नाव कोरलं. त्याच्या या विजयानं संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. हरयाणा सरकार ते बीसीसीआय पर्यंत अनेकांनी त्याला बक्षीस जाहीर केलं आहे. त्या यादीमध्ये आता उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचा समावेश झाला आहे.

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. नीरज चोप्रानं गोल्ड मेडल पटकावताच त्यांनी लगेच खास ट्विट करत आनंद व्यक्त केला. महिंद्रा यांनी ट्विटर अकाऊंटवरुन दोन फोटो शेअर केले. त्यामध्ये एक फोटो नीरज चोप्राचा होता. तर दुसरा बाहुबली सिनेमातील एक प्रसंग आहे. 'आम्ही सर्व तुमच्या सैन्यात आहोत', असं कॅप्शन चोप्रा यांनी या फोटोला दिलं आहे.

त्यानंतर एका ट्विटर युझरनं महिंद्रांना तुम्ही नीरज चोप्राला XUV700 गिफ्ट देणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना महिंद्रा यांनी होय, नक्कीच ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट असेल. मी आपल्या गोल्ड मेडल पटकावणाऱ्या खेळाडूला XUV700 ही गाडी भेट देईल.' अशी घोषणा केली. त्यानंतर महिंद्रा यांनी कंपनीच्या दोन बड्या अधिकाऱ्यांना त्या ट्विटमध्ये टॅग करत नीरजसाठी खास गाडी तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Tokyo Olympics : BCCI ने तिजोरी उघडली, गोल्डन बॉय नीरजसह विजेत्यांना भरघोस मदत

भारताला एथलेटिक्समध्ये याआधी एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतरानं हुकलं होतं. हा दुष्काळ नीरज  यंदा संपवेल अशी देशाला आशा होती, आणि नीरजनेही देशाचं स्वप्न पूर्ण केलं. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड मेडल मिळवलं होतं.

First published:

Tags: Olympics 2021