मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : 'मेरे पास माँ है!' अदिती अशोकच्या ऐतिहासिक कामगिरीची Untold Story

Tokyo Olympics : 'मेरे पास माँ है!' अदिती अशोकच्या ऐतिहासिक कामगिरीची Untold Story

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फर आदिती अशोकनं (Aditi Ashok) ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण देशाचं मन जिंकलं आहे. अदितीच्या या खेळात तिच्या आईचा मोठा वाटा आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 7 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फर आदिती अशोकचं (Aditi Ashok) मेडल अवघ्या एका स्ट्रोकमुळे हुकलं. वर्ल्ड रँकिंगमध्ये 179 व्या नंबरवर असलेल्या अदितीनं या ऑलिम्पिकमध्ये जोरदार खेळ करत  दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. अदितीचं मेडल हुकलं असलं तरी तिनं  ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण देशाचं मन जिंकलं आहे. ऑलिम्पिकपूर्वी फार चर्चेत नसणाऱ्या आदितीनं तिच्या खेळामुळे अनेकांना पहिल्यांदाच गोल्फ मॅच पाहण्यास भाग पाडले आहे. अदितीच्या या ऐतिहासिक कामगिरीत तिच्या आईचा मोठा वाटा आहे.

आई बनली सावली!

टोकयो ऑलिम्पिकमध्ये अदितीच्या आई तिची सावली म्हणून वावरली. अदितीच्या आईचं नाव माहेश्वरी अशोक असं असून त्या या स्पर्धेत अदितीच्या कॅडी होत्या. वयाच्या 5 व्या वर्षीच गोल्फ खेळण्यास सुरुवात केलेल्या अदितीनं 2016 च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी अदितीचे वडील तिचे कॅडी होते.

चार दिवस चालणाऱ्या या खेळात गोल्फपटूला सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचं आव्हान असतं. त्या परिस्थितीमध्ये कॅडीचं महत्त्व मोठं आहे. गोल्फपटूचा उत्साह कायम ठेवणे, त्याला खेळताना हवी असणारी सर्व मदत करणे हे कॅडीचे काम असते. वडिलांपेक्षा आपण आईसोबत जास्त मोकळेपणे खेळू शकतो, असं अदितीनं सांगितलं आहे.

अदितीची कारकिर्द

बंगळुरुतील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अदितीनं वयाच्या 5 व्या वर्षीच गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी बंगळुरुमध्ये फक्त तीन गोल्फ कोर्स होते. अदितीनं वयाच्या 9 व्या वर्षीच पहिली गोल्फ स्पर्धा जिंकली. अदिती वयाच्या 12 व्या वर्षीच राष्ट्रीय टीमची सदस्य बनली. महिलांची युरोपीयन टूर स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.

EXPLAINER : सिल्व्हर मेडलपेक्षा ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू जास्त आनंदी का असतात?

अदितीनं 2016 साली रिओ झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी ती फक्त 18 वर्षांची होती. सर्वात कमी वयात ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा विक्रम अदितीनं केला होता. अदितीला 2020 साली अर्जुन पुरस्कारानंही गौरवण्यात आले आहे.

First published:

Tags: Olympics 2021