मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympic : ऑलिम्पिकआधी पंतप्रधान मोदींची भारतीय खेळाडूंसोबत 'मन की बात'

Tokyo Olympic : ऑलिम्पिकआधी पंतप्रधान मोदींची भारतीय खेळाडूंसोबत 'मन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) क्वालिफाय झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत मंगळवारी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) क्वालिफाय झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत मंगळवारी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) क्वालिफाय झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत मंगळवारी संवाद साधला.

  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 13 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) क्वालिफाय झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत मंगळवारी संवाद साधला. पंतप्रधानांनी खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी दीपिका कुमारी (Deepika Kumari), नीरज चोप्रा (Neeraj Chopra), दुत्ती चंद (Dutti Chand), मेरी कॉम (Mary Kom) यांच्यासह अनेक खेळाडूंच्या सुरुवातीच्या प्रवासाबाबात माहिती घेतली. खेळाडूंसोबत संपूर्ण देश आहे, त्यांनी दबावात यायची गरज नाही, असंही पंतप्रधानांनी खेळाडूंना सांगितलं. सगळ्यात आधी मोदींनी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दीपिका कुमारीसोबत चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी दीपिकाला पॅरिसमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. 'दीपिकाने पॅरिसमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. आता ती क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. लहानपणी आंबे तोडण्यासाठी तू निशाणा लावायचीस. आंब्यापासून सुरू झालेली ही यात्रा खूप खास आहे,' असं पंतप्रधान म्हणाले. यानंतर दीपिकानेही आपला सुरुवातीचा प्रवास खडतर असल्याचं सांगितलं. सरकार आणि असोसिएशनने मला पुढे जाण्यासाठी मदत केली. आंबे मला खूप आवडायचे, त्यामुळे तिकडूनच माझी निशाणा लावायला सुरुवात झाली. सुरुवातीला माझ्याकडे जास्त साधनं नव्हती, पण एका वर्षानंतर मला चांगले प्रशिक्षक आणि सुविधा मिळाल्याचं दीपिकाने सांगितलं.

दीपिकानंतर पंतप्रधानांनी जॅवलिन थ्रोअर नीरज चोप्रासोबतही चर्चा केली, तसंच त्याच्या दुखापतीबाबत विचारपूस केली. 'दुखापतीनंतरही नीरजने नॅशनल रेकॉर्ड केलं आणि मेडल जिंकण्याची अपेक्षा वाढवली. तुमचा संबंध लष्कराशी आहे, तुम्हाला दुखापत झाली, तरीही नॅशनल रेकॉर्ड केलंत. या परिस्थितीमध्ये स्वत:चं मनोबल कसं सांभाळलं?' असा प्रश्न मोदींनी नीरजला विचारला.

नीरजनेही पंतप्रधानांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'मी खेळावर लक्ष देत आहे. सेना आणि सरकारचं संपूर्ण समर्थन मिळत आहे. दुखापत तर खेळाचा भाग आहे, आम्हाला मानसिकदृष्ट्या यासाठी तयार असावं लागतं. वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी मी तयारी केली होती, पण मला दुखापत झाली. आता माझं संपूर्ण लक्ष ऑलिम्पिकवर आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल,' असं नीरज चोप्रा म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुत्ती चंदसोबतही संवाद साधला. दुत्ती चंदनेही मी आज जी काही आहे ती खेळामुळेच आहे, असं पंतप्रधानांना सांगितलं. 'आज स्पोर्ट्समुळे मी आहे, यामुळेच मला नोकरीही मिळाली आणि माझं कुटुंब यामुळे चालत आहे. मी तुम्हाला धन्यवाद देते. आयुष्यात कायमच मला आव्हानांचा सामना करावा लागला. मी दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये जात आहे. महिला पुढे जातील आणि देशाचं नाव मोठं करतील, याचा मला विश्वास आहे. मी मेडल जिंकण्याचा प्रयत्न करेन,' असं दुत्ती चंद म्हणाली.

तिरंदाज प्रविण जाधव (Pravin Jadhav) यानेही टोकयो ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलं आहे. प्रविण जाधवने ऍथलीट म्हणून करियरची सुरुवात केली, पण नंतर तो तिरंदाज झाला. पंतप्रधान मोदींनीही प्रविणची कहाणी जाणून घेतली. 'पहिले मी ऍथलीट होतो, पण माझं शरीर कमजोर होतं. तू दुसऱ्या खेळात चांगली कामगिरी करू शकतो, असं मला माझ्या प्रशिक्षकांनी सांगितलं. यानंतर मला तिरंदाजी देण्यात आली. मी अमरावतीमध्ये खूप सराव केला. घरात गरिबी असल्यामुळे खेळात मेहनत घेतली नाही, तर मला मजुरी करावी लागेल, हे माहिती होतं, त्यापेक्षा तिरंदाजी केलेली चांगली, असं मला वाटलं. हार मानली तर सगळं संपून जाईल, असा विचार मी केला. त्यामुळे मी भरपूर प्रयत्न केले आणि यशस्वी झालो,' असं प्रविणने सांगितलं.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रविणच्या आई-वडिलांचंही कौतुक केलं. 'तुझे आई-वडीलही चॅम्पियन आहेत. त्यांनी मजुरी करूनही तुला चॅम्पियन केलं. तूदेखील मेहनत आणि इमानदारीची ताकद काय असते, ते दाखवून दिलंस,' असं म्हणत मोदींनी प्रविणची स्तुती केली.

First published:

Tags: Olympics 2021