मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /महापौरांनी दाताने चावल्यामुळे तुटलं Olympic Medal, सोशल मीडियावर संतापाची लाट

महापौरांनी दाताने चावल्यामुळे तुटलं Olympic Medal, सोशल मीडियावर संतापाची लाट

महापौरांनी तोडलं ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल

महापौरांनी तोडलं ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल

जपानच्या नागोया शहराचे महापौर ताकाशी कावामुरा ((Takashi Kawamura) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) गोल्ड मेडल जिंकणाऱ्या सॉफ्टबॉल खेळाडू मियू गोटोला (Miyu Goto) भेटले. या भेटीदरम्यान महापौरांनी मियूला मिळालेलं मेडल चावलं, यात त्या मेडलचे तुकडे झाले.

पुढे वाचा ...

मुंबई, 13 ऑगस्ट : ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर विजेते खेळाडू हे मेडल दाताने चावलेलं आपण अनेकवेळा बघतो. जपानमधल्या एका महापौरांनाही असंच करायचं होतं, पण त्यांच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. जपानच्या नागोया शहराचे महापौर ताकाशी कावामुरा ((Takashi Kawamura) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) गोल्ड मेडल जिंकणाऱ्या सॉफ्टबॉल खेळाडू मियू गोटोला (Miyu Goto) भेटले. या भेटीदरम्यान महापौरांनी मियूला मिळालेलं मेडल चावलं, यात त्या मेडलचे तुकडे झाले. ऑलिम्पिक प्रशासनाने मात्र मियूसाठी नवीन मेडल तयार करू असं आश्वासन दिलं आहे.

जपानमधल्या मीडियाच्या समोरच महापौर ताकाशी यांनी मियूला मिळालेलं मेडल चावलं. मेडल चावल्यानंतर लगेचच त्याचा तुकडा पडल्याचा आवाज आला. या घटनेनंतर महापौरांविरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. या प्रकारानंतर महापौर ताकाशी कावामुरा यांनी माफीही मागितली आहे. खेळाडूने गोल्ड मेडल मिळवण्यासाठी इतकी वर्ष मेहनत केली, ते मेडल आपण खराब केलं, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) खेळाडू संघटनेचे सदस्य युकी ओटा यांनीही ताकाशी यांच्यावर टीका केली आहे. महापौरांना खेळाडूविषयी आदर नाही, तसंच त्यांना कोरोना नियमाचीही परवा नाही, हे यातून दिसत असल्याचं युकी ओटा म्हणाले.

महापौरांनी माफी मागितली असली तरी त्यांच्याविरोधातला रोष कमी झाला नाही. जपान सरकारच्या वृत्तसंस्थेनुसार माफी मागितल्यानंतरही ताकाशी यांच्याबद्दल नागोया सिटी हॉलला 7 हजारांपेक्षा जास्त ई-मेल आणि फोन आले, ज्यात महापौरांनी केलेल्या कृत्यावर संताप व्यक्त करण्यात आला.

First published:

Tags: Japan, Olympics 2021