• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • गोल्डन बॉय नीरज चोप्राला Khel Ratna , शिखर धवनसह 35 खेळाडूंना Arjuna Award!

गोल्डन बॉय नीरज चोप्राला Khel Ratna , शिखर धवनसह 35 खेळाडूंना Arjuna Award!

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. नीरजशिवाय टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या रवी दहिया, पीआर श्रीजेश आणि लवलीना बोरगोहोई, भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) आणि फूटबॉलपटू सुनील चेत्री (Sunil Chhetri)यांनाही खेल रत्न पुरस्कार दिला जाणार आहे. 2021 हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी खास होतं. ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली. पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच दोन पदकं जिंकणाऱ्या अवनी लेखराचाही खेल रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय पॅरालिम्पिकमध्ये एफ64 मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या सुमित अंतिल याचाही खेल रत्न देऊन गौरव करण्यात येईल. या 12 खेळाडूंना खेल रत्न नीरज चोप्रा (एथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पीआर श्रीजेश (हॉकी), लवलीना बोर्गोहेन (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फूटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत ( पॅरा बॅडमिंटन), सुमित अंतिल (पॅरा भाला फेक), अवनी लेखरा (पॅरा शूटिंग), कृष्णा नगर ( पॅरा बॅडमिंटन), एम नरवाल (पॅरा शूटिंग), मनप्रीत सिंग (हॉकी) 35 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार योगेश कथुनिया (डिस्कस थ्रो), निषाद कुमार (हाय जम्प), प्रवीण कुमार (हाय जम्प), शरद कुमार (हाय जम्प), सुहास एलवाई (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अंधाना (शूटिंग), भाविना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (तीरंदाजी), शिखर धवन (क्रिकेट), अरपिंदर सिंग (ऍथलिटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), भवानी देवी आनंदा (फेन्सिंग), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी परब (मल्लखांब), अभिषेक वर्मा (शूटिंग), अंकिता रैना (टेनिस), दीपक पुनिया(कुस्ती), दीलप्रीत सिंग (हॉकी), हरमनप्रीत सिंग (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी), बिरेंद्र लकरा (हॉकी), सुमित (हॉकी), निलकांता शर्मा (हॉकी), हार्दिक सिंग (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरुजंत सिंग (हॉकी), मनदीप सिंग (हॉकी), शमशेर सिंग (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंग (हॉकी) छेत्री पहिला फूटबॉलपटू दिग्गज फूटबॉलपटू सुनील छेत्री खेल रत्न पुरस्कार मिळणारा पहिला फूटबॉलपटू आहे. मागच्या वर्षी पाच खेळाडूंना खेल रत्न पुरस्कारांसाठी निवडण्यात आलं होतं. 2016 रियो ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं होतं. 13 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
    Published by:Shreyas
    First published: