ऑलिंपिकवर कोरोनाचं सावट, यंदाची स्पर्धा होणार रद्द?

ऑलिंपिकवर कोरोनाचं सावट, यंदाची स्पर्धा होणार रद्द?

कोरोना व्हायरसचा प्रभाव सर्वत्र वाढताना दिसतो आहे. जर येत्या मे महिन्यापर्यंत कोरोना नियंत्रणात नाही आला तर टोकीयो ओलिंपिक रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टोकियोच्या चिबा शहरात कोरोनाचे संशयित आढळले आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 फेंब्रुवारी: यंदा जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकवर कोरोनाचं संकट वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक भयभीत झाली आहेत. चीनसोबतच इराक अफगाणिस्तान, बहरीन, कुवेत, ओमान, लेबनान, यूएई आणि कॅनडामध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे टोकियोच्या चिबा शहरात देखिल कोरोनाचे 3 संशयित आढळून आले आहेत. यामुळेच आंतराष्ट्रीयपातळीवर होणाऱ्या ऑलिंपिकसाठी मोठा निर्णय आंतराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटी म्हणजेच ‘आयओसी’नं घेतला आहे.

आपल्याकडे तीन महिन्याचा वेळ आहे. या वेळात आपण टोकियो ऑलिंपिकवर निर्णय घेवृ असं आयओसीचे सदस्य आणि ओलिंपिकचे चॅपिंयन तैराक डिक पाउंड यांनी सांगितल आहे . मे महिन्यापर्यंत ऑलिंपिकची तयारी ही अंतिम रूपात येईल. त्याआधी कोरोनाचा प्रभाव लक्षात घेवून आपण निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यंदा होणारी ऑलिंपिक ही 24 जुलैला सुरू होणार असून 9 ऑगस्टला संपणार आहे. याआधी मे महिन्यापर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी झाला नाही तर ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या तारखा पुढे न ढकलता ही स्पर्धा थेट रद्द करण्यात येणार आहे.

टोकियोमध्ये कोरोनाचे संशयित आढळल्यानं याठिकाणी होणाऱ्या तलवारबाजी, कुस्ती आणि सर्फिंग या खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या निर्णयाकडे जगभरातल्या खेळाडूंचं लक्ष लागलं आहे. जगभरातील खेळाडू या स्पर्धेच्या तयारीला देखील लागते आहेत. ऑलिंपिकमध्ये आपल्या देशासाठी पदक मिळवणं हे प्रत्येक खेलाडूचं स्वप्न असतं. त्यामुळे खेळाडू कसून मेहनत घेत असतात. अशातचं कोरोनामुळे स्पर्धा रद्द झाली तर क्रिडाप्रेमींमध्ये निराजी पसरेल.

इतर बातम्या - कोरोनाचा धोका :  वुहाननंतर 'हा' व्हायरसचा केंद्रबिंदू, या देशात सर्वाधिक मृत्यू

आतापर्यंत कोणकोणत्या टूर्नामेंट रद्द झाल्यात?

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये होणारी बॉक्सिंग आणि बैटमिंटनच्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. चीनसोबतच दक्षिण कोरियामध्ये होणारी टेबल टेनिसची विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. याआधी आंतराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघान यासंबंधीची घोषणा केली आहे. 22 ते 29 मार्चपर्यंत प्रस्तावित विश्वचषक पुढे ठकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.टेनिस विश्वचषक स्पर्धा टोकियो ऑलिंपिकच्या अगोदर होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - सामनावीर मिळाला तीच कसोटी ठरली शेवटची, भारतीय क्रिकेटपटूची निवृत्ती

First published: February 26, 2020, 2:22 PM IST

ताज्या बातम्या