मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympic: ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी खळबळ, एक खेळाडू जपानमध्ये बेपत्ता

Tokyo Olympic: ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी खळबळ, एक खेळाडू जपानमध्ये बेपत्ता

ऑलिम्पिक स्पर्धा सुरू (Olympic 2021) होण्यास 6 दिवस उरले असतानाच एका खळबळजनक घटनेनं जपान हादरलं आहे. या स्पर्धेसाठी जपानमध्ये आलेला एक विदेशी खेळाडू बेपत्ता झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 17 जुलै : ऑलिम्पिक स्पर्धा सुरू (Olympic 2021) होण्यास 6 दिवस उरले असतानाच एका खळबळजनक घटनेनं जपान हादरलं आहे. या स्पर्धेसाठी जपानमध्ये आलेला एक विदेशी खेळाडू बेपत्ता झाला आहे. कोरोना व्हायरसचं (Coronavirus) या संपूर्ण स्पर्धेवर सावट आहे. त्यामध्येच एक खेळाडू बेपत्ता झाल्यानं ऑलिम्पिकमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्व उपस्थित झाला आहे.

बेपत्ता खेळाडू युगांडा (Uganda) देशाचा वेटलिफ्टर असल्याची माहिती आहे. ज्यूलिअस सेकिटोलको  (Julius Ssekitoleko) असे त्याचे नाव आहे.  युगांडाचे 9 सदस्यांचे पथक ओसाका राज्यातील इजुमिसानो शहरात ट्रेनिंग करत होते. ज्यूलिअस देखील  त्याच टीमचा सदस्य होता, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. तो शुक्रवारी बेपत्ता झाला आहे.

ज्यूलिअस शुक्रवारी रोजची PCR टेस्ट करण्यासाठी आला नाही. त्यानंतर हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतल्यावर तो बेपत्ता झाल्याचं उघड झालं. त्याची हॉटेलमधील रूम रिकामी होती. त्याला सकाळी हॉटेलमध्ये काही जणांनी पाहिले होते. मात्र त्याने त्या दिवशी ट्रेनिंगमध्ये भाग घेतला नाही.

'जपानमध्ये आलेला युगांडाचा एक खेळाडू बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्याचे सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. पोलिसांना देखील याबाबतची माहिती दिली आहे,' असे ऑलिम्पिक आयोजन समितीने स्पष्ट केले आहे.

ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव

23 जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील क्रीडापटू टोकयोमध्ये (Tokyo Olympic 2021) दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी  टोकयोमधील ऑलिम्पिक व्हिलिजेमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

क्या बात है! 1 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी हवे होते 35, 'त्याने' लगावले 6,6,6,6,6,6

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याची ही पहिलीच घटना आहे, असं आयोजन समितीनं सांगितलं आहे. जपानसह जगभरातील कोरोनाचा धोका अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करावी अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्या मागणीकडं दुर्लक्ष करत जपान सरकार आणि ऑलिम्पिक समितीनं ही स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. कोरोना लाटेमनुळे ही स्पर्धा यंदा एक वर्ष उशीरा होत आहे.

First published:

Tags: Olympics 2021