मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympic: सिंधूनं शेअर केला खास Photo, फोटोमधील व्यक्ती कोण याची चर्चा सुरू

Tokyo Olympic: सिंधूनं शेअर केला खास Photo, फोटोमधील व्यक्ती कोण याची चर्चा सुरू

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) टोकयो ऑलिम्पिकसाठी (Tokyo Olympic) सज्ज झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना सिंधूनं एक खास फोटो शेअर केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14  जुलै : टोकयो ऑलिम्पिकचं (Tokyo Olympic) काऊंट डाऊन आता सुरू झालं आहे. क्रीडा विश्वातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्यासाठी ते अनेक वर्ष कठोर परिश्रम करतात. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) धोक्यामुळे यंदाचे ऑलिम्पिक एक वर्ष उशीरा होत आहे. आताही या ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे काही संघटनांनी याच्या आयोजनाला विरोध केला. कोरोनाचं संकट, सामाजिक संघटनांचा विरोध याचा कोणताही परिणाम भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेवर झालेला नाही. त्यांना आता ऑलिम्पिकचे वेध लागले आहे.

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) देखील या ऑलिम्पिकसाठी सज्ज झाली आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलेल्या सिंधूकडून यंदा गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. सिंधूला देखील आता ऑलिम्पिकचा ध्यास लागलाय. ऑलिम्पिकच्या तयारीची धावपळ सुरू असतानाच सिंधूनं एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय. जो आता व्हायरल (Viral) झाला आहे.

सिंधूनं फक्त हाताच्या बोटांचा फोटो शेअर केलाय. त्यावरी दोन बोटांवर नेलपॉलिश आहे. या दोन बोटांवर ऑलिम्पिकचे प्रतीक नेलपॉलिशनं रंगवण्यात आले आहे. हा फोटो कुणाचा आहे हे सिंधूने सांगितलेले नाही. मात्र तिने सर्व ऑलिम्पिकचे हॅशटॅग वापरले आहेत. त्यामुळे हा फोटो सिंधूचा आहे की आणखी कुणाचा? याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

On This Day : न्यूझीलंडचा पराभव न होताच इंग्लंडने जिंकला वर्ल्ड कप

मोदींनी साधला खेळाडूंशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) क्वालिफाय झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत मंगळवारी संवाद साधला. पंतप्रधानांनी खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी दीपिका कुमारी (Deepika Kumari), नीरज चोप्रा (Neeraj Chopra), दुत्ती चंद (Dutti Chand), मेरी कॉम (Mary Kom) यांच्यासह अनेक खेळाडूंच्या सुरुवातीच्या प्रवासाबाबात माहिती घेतली. खेळाडूंसोबत संपूर्ण देश आहे, त्यांनी दबावात यायची गरज नाही, असंही पंतप्रधानांनी खेळाडूंना सांगितलं

First published:

Tags: Olympics 2021, Photo viral, Social media