टोकयो, 04 ऑगस्ट: रवी कुमारने 2 वेळचा जगज्जेता असणाऱ्या नरिस्लाम सान्यायेव्हला या कजाकिस्तानच्या खेळाडूला हरवलं. 57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल रेससिंग प्रकारात भारताला पहिलं गोल्ड मिळण्याची आता आशा आहे. हरयाणातल्या एका छोट्या गावात वाढलेला रविकुमार दहिया शेतकऱ्याचा मुलगा. 2019 मध्ये वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 57 किलो वजनी गटात ब्राँझ पदक जिंकून त्याने देशां लक्ष वेधून घेतलं होतं. पण तिथपर्यंतचा प्रवास रवीसाठी सोपा नव्हता.
शेतात मजुरी करून पोट भरणारे सामान्य कुटुंब (Ravi kumar dahiya Indian wrestler profile)
हरयाणात सोनिपत जिल्ह्यातल्या नाहरी नावाच्या गावात रवीचा जन्म झाला. वडील शेतकरी. तेही दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून पोट भरणारे सामान्य कुटुंब. पण गरीब असले तरी राकेश दहिया यांनी आपल्या मुलातली गुणवत्ता हेरली आणि त्याला योग्य प्रशिक्षण मिळवून द्यायचा प्रयत्न केला.
वयाच्या दहाव्या वर्षापासून रवी घरापासून दूर राहून कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर तो प्रॅक्टिस करत असे. वडील राकेश दहिया दररोज त्याचा कुस्तीसाठी आवश्यक असलेला खुराक द्यायला नाहरी ते दिल्ली असा प्रवास करत असत. कुस्तीसाठी आवश्यक दूध, फळं थेट गावाहून रवीपर्यंत पोहोचत. एवढ्या मेहनतीनंतर तो देशपातळीवर खेळू लागला आणि यंदा ऑलिंपिकमध्ये उतरण्याची संधी रवीला मिळाली.
आता फायनलमध्ये तो सुवर्णपदकाचा दावेदार आहे. किमान सिल्व्हर पदकाची निश्चिती रवीमुळे मिळाली आहे. सामान्य घरातल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाची पदकापर्यंतची जिद्द म्हणूनच अधिक मोठी ठरते. घरातल्या, गावातल्या आणि अर्थातच देशातल्या प्रत्येकासाठी रविकुमारचा पदकापर्यंतचा प्रवास म्हणूनच मोठा आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021