Tokyo Olympic 2020 : रशियाला दणका! 2020 ऑलिम्पिक आणि 2020 फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर

Tokyo Olympic 2020 : रशियाला दणका! 2020 ऑलिम्पिक आणि 2020 फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर

डोपिंगप्रकरणी रशियावर WADAने घातली चार वर्षांची बंदी.

  • Share this:

स्वित्झर्लंड, 09 डिसेंबर : जागतिक डोपिंग विरोधी संस्था (WADA)नं रशियाविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. डोपिंगप्रकरणी रशियावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे रशियाचा संघ ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही आहे. ऑलिम्पिक 2020 टोकियो येथे होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात रशियाकडे अपील करण्यासाठी 21 दिवस आहेत, असे वाडाच्या वतीनं सांगण्यात आले आहे. यापूर्वीही 2015 ते 2018 या काळात रशियावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या शिखर परिषदेत शनिवारी वाडाचे अध्यक्ष क्रेग रेडी यांनी, “मॉस्कोमध्ये घेण्यात आलेल्या खेळाडूंच्या चाचण्यात छेडछाड करण्यात आली होती, याबबात मी तीव्र निषेध व्यक्त करतो. हा या खेळावर केलेला हल्ला आहे. असे काम करणार्‍यांविरूद्ध कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.", असे सांगितले.

वाचा-नवीन मोबाईलवर मिळतोय 1 किलो कांदा मोफत! बाजारात आली हटके ऑफर

ड्रग्ज सेवन प्रकरणामुळे पुढील चार वर्षांसाठी रशियाला सर्व मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंटमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाडाने रशियावर चार बंदी घातली आहे, ज्यामुळे ते टोकियो ऑलिम्पिक आणि कतारमधील 2022 फुटबॉल विश्वचषकात भाग घेऊ शकणार नाही.

वाचा-फेसबुकसमोर पोलिसही हरले! 12 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलीला मिळाले आई-बाबा

वाचा-VIDEO : लाईव्ह सामन्यात खेळाडूंआधी सापाने लावली हजेरी आणि...

स्वित्झर्लंडमध्ये वाडाने घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. रशियावर पुढील चार वर्षे बंदी घालण्याचा निर्णय वाडा समितीने एकमताने घेतला. या वर्षाच्या जानेवारीत रशियाच्या अँटी-डोपिंग एजन्सीने तपासणी दरम्यान प्रयोगशाळेतील डेटामध्ये छेडछाड केल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला.

वाचा-टीम इंडियाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहून विराट झाला 'सुपरमॅन', सामन्यानंतर...

दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात रशियाकडे अपील करण्यासाठी 21 दिवस आहेत. रशियाने 2014च्या हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. इतकेच नाही तर, गेल्या वर्षी रशियामध्येही 2018 चा फुटबॉल वर्ल्ड कप खेळला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या