मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympic : बायोपिक येणार का? गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मन जिंकणारं उत्तर

Tokyo Olympic : बायोपिक येणार का? गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मन जिंकणारं उत्तर

नीरज चोप्राचं बायोपिकवर उत्तर

नीरज चोप्राचं बायोपिकवर उत्तर

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं. टोकयो ऑलिम्पिकमधलं भारताचं हे पहिलं गोल्ड मेडल होतं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 ऑगस्ट : नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भालाफेक स्पर्धेत (Men's javelin throw) ऐतिहासिक कामगिरी करत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं. टोकयो ऑलिम्पिकमधलं भारताचं हे पहिलं गोल्ड मेडल होतं. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं दुसरं तर ऍथलिटिक्समधलं पहिलंच गोल्ड मेडल मिळवण्याचा विक्रम नीरजने केला. गोल्ड मेडल मिळवल्यानंतर नीरज चोप्रा याला बायोपिकबाबत (Neeraj Chopra Biopic) प्रश्न विचारण्यात आला. पण सध्या तरी बायोपिकबाबतच्या कोणत्याही ऑफरबाबत विचार केला नाही. 2022 सालचे आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्सवर लक्ष देणं माझी प्राथमिकता आहे, असं उत्तर नीरजने दिलं.

जोपर्यंत एखादा खेळाडू सक्रीय आहे, तोपर्यंत त्याचा बायोपिक बनू नये. जेव्हा माझं करियर संपेल, तेव्हा याबाबत विचार करू, असं नीरज चोप्रा म्हणाला. नीरजने टोकयोमध्ये जिंकलेलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना समर्पित केलं. मिल्खा सिंग यांचं यावर्षी कोरोनामुळे निधन झालं. भारताच्या एथलिटने ट्रॅक एण्ड फील्डमध्ये गोल्ड मेडल जिंकावं, असं स्वप्न मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचं होतं, पण नीरजने त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं. पीटी उषा (PT Usha) यांचं मेडल जिंकण्याचं स्वप्न 1984 साली अगदी थोड्या अंतराने हुकलं होतं.

मिल्खा सिंग यांचे बरेच व्हिडिओ मी बघितले. मला जे करता आलं नाही, ते एखाद्या भारतीयाने करावं, असं ते म्हणायचे. जेव्हा मी जिंकलो आणि राष्ट्रगीतासाठी उभा राहिलो तेव्हा मला मिल्खा सिंग याची आठवण आली, अशी भावनिक प्रतिक्रिया नीरजने दिली. पीटी उषाही आता आनंदी झाल्या असतील, असंही तो म्हणाला.

सध्या तरी मी विजयाचा जल्लोष करणार आहे. मला घरी जायचं आहे. जर योग्य प्रशिक्षण झालं तर यावर्षी आणखी एका स्पर्धेत सहभागी व्हायचा विचार आहे. यानंतर कॉमनवेल्थ, आशियाई खेळ आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपवर लक्ष केंद्रीत करायचं आहे, असं नीरजने सांगितलं.

First published:

Tags: Olympics 2021