Tokyo Olympic : नीरजने दाखवलं मोठं मन! म्हणाला, 'पाकिस्तानचा अर्शद मेडल जिंकला असता तर...'
Tokyo Olympic : नीरजने दाखवलं मोठं मन! म्हणाला, 'पाकिस्तानचा अर्शद मेडल जिंकला असता तर...'
फायनलमध्ये रंगला भारत-पाकिस्तान सामना
नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भालाफेक स्पर्धेत (Men's javelin throw) गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला. ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.
मुंबई, 9 ऑगस्ट : नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भालाफेक स्पर्धेत (Men's javelin throw) गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला. ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण 7 मेडल मिळाली, यात एक गोल्डन, दोन सिल्व्हर आणि चार ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. एका ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेली ही सर्वाधिक पदकं आहेत.
न्यूज 18 सोबत बोलताना नीरज चोप्राने फायनलमधला आपला प्रतिस्पर्धी अर्शद नदीमविषयी (Arshad Nadeem) वक्तव्य केलं. जर नदीमला मेडल मिळालं असतं तर चांगलं झालं असतं. आशिया खंडाचं नाव झालं असतं, असं नीरज म्हणाला. क्वालिफिकेशनमध्ये नीरज 86.65 मीटरसोबत आपल्या ग्रुपमध्ये टॉपवर राहिला. तर अर्शद नदीम 85.16 मीटरसह त्याच्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. यानंतर फायनलआधी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मुकाबल्यावर चर्चा झाली. नदीम फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला, त्यामुळे त्याला मेडल मिळालं नाही.
अजिबात रोमांचित नव्हतो
नदीमसोबतच्या प्रतिस्पर्धेबाबत आपण अजिबात रोमांचित नव्हतो, असं नीरज म्हणाला. 'हे क्रिकेटमध्ये चालतं, कारण तिथे 7-8 देशच असतात, पण ऑलिम्पिकमध्ये हे सगळं करणं योग्य नाही,' असं नीरज म्हणाला.
नीरज चोप्राला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर अर्शद नदीम त्याला जाऊन भेटला. नदीमने आपलं अभिनंदन केल्याचं नीरजने सांगितलं. तसंच आपणही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याचंही नीरज म्हणाला.
पाकिस्तानला 1992 नंतर ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकता आलं नाही. पाकिस्तानकडे 3 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ सह एकूण 10 मेडल आहेत. टोकयो ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानकडून 10 खेळाडू आले होते, पण कोणालाही मेडल जिंकता आलं नाही. तर भारताकडून 124 खेळाडूंनी 7 मेडल जिंकली. भारताला 13 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.