मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympic 2020 : 80 हजार टन मोबाईलपासून तयार करण्यात आली ऑलिम्पिक मेडल

Tokyo Olympic 2020 : 80 हजार टन मोबाईलपासून तयार करण्यात आली ऑलिम्पिक मेडल

जपानमध्ये समारोपाच्या दिशेने वाटचाल करणारं टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) विविध कारणांसाठी चर्चेत आहे. यापैकी एक कारण म्हणजे, या वर्षीची खास मेडल्स. गेल्या वर्षीच जेव्हा या मेडल्सचं प्रदर्शन (Tokyo Olympics Medal design) करण्यात आलं, तेव्हा त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं.

जपानमध्ये समारोपाच्या दिशेने वाटचाल करणारं टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) विविध कारणांसाठी चर्चेत आहे. यापैकी एक कारण म्हणजे, या वर्षीची खास मेडल्स. गेल्या वर्षीच जेव्हा या मेडल्सचं प्रदर्शन (Tokyo Olympics Medal design) करण्यात आलं, तेव्हा त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं.

जपानमध्ये समारोपाच्या दिशेने वाटचाल करणारं टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) विविध कारणांसाठी चर्चेत आहे. यापैकी एक कारण म्हणजे, या वर्षीची खास मेडल्स. गेल्या वर्षीच जेव्हा या मेडल्सचं प्रदर्शन (Tokyo Olympics Medal design) करण्यात आलं, तेव्हा त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं.

पुढे वाचा ...

    टोकयो, 8 ऑगस्ट : जपानमध्ये समारोपाच्या दिशेने वाटचाल करणारं टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) विविध कारणांसाठी चर्चेत आहे. यापैकी एक कारण म्हणजे, या वर्षीची खास मेडल्स. गेल्या वर्षीच जेव्हा या मेडल्सचं प्रदर्शन (Tokyo Olympics Medal design) करण्यात आलं, तेव्हा त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं. या मेडल्सचे डिझायनर जुनिची कावानिशी (Tokyo Olympics medals designer) हे जगभरात प्रसिद्ध झाले होते. ऑलिम्पिक पॅरालिम्पिक गेम्सच्या पदकांचे डिझाईन (Olympic Medal Design) कसे असावे, यासाठी जपानमध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली होती. ओसाकामध्ये राहणाऱ्या जुनिची यांनी ही स्पर्धा जिंकली होती.

    जुनिची यांनी डिझाईन केलेली ही मेडल गोलाकार असून, त्यांचा व्यास 85 मिलीमीटर आहे. या मेडलवर ग्रीक संस्कृतीमधील विजयाची देवता नाईकीचे (Greek Goddess of Victory) चित्र कोरलं आहे. विशेष म्हणजे ही मेडल्स रिसायकल केलेल्या मेटलपासून (Olympic medals from recycled metal) बनवण्यात आली आहेत. हिच मेडल्स टोकिओ ऑलिंपिक 2021 मध्ये विजेत्या खेळाडूंना देण्यात आली. जपानी नागरिकांनी दान केलेल्या तब्बल 62 लाख उपकरणांमधून (Olympic medal from recycled electronics) काढण्यात आलेल्या मेटलचा वापर करुन ही मेडल तयार करण्यात आली आहेत. ऑलिम्पिक आणि पॅरालम्पिक गेम्समध्ये मिळून सुमारे 5000 मेडल्स देण्यात येतात. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ मेडल दिली जातात.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये लागणारी मेडल्स तयार करण्यासाठी सुमारे 80 हजार टन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसचा (Olympic medals made from scrap) वापर करण्यात आला होता. या उपकरणांमधून सुमारे 71 पाउंड सोने, 7,700 पाउंड चांदी आणि 4,850 पाउंड ब्रॉन्झ धातू मिळवण्यात आला होता. कावानिशी यांनी सांगितले, की आपली पृथ्वी आणि प्रकाश या दोन्हीचे प्रतीक म्हणून पदकांचा समोरचा भाग गोल ठेवण्यात आला आहे.

    जुनिची यांनी मेडल डिझायनिंगच्या स्पर्धेमध्ये विजय मिळवल्याचे त्यांना फोन करुन सांगण्यात आले होते. तसेच, अधिकृतरित्या मेडल्सचे डिझाईन प्रदर्शित केले जात नाही, तोपर्यंत ते गुप्त ठेवण्यास जुनिची यांना सांगण्यात आले होते. सुमारे 400 प्रतिस्पर्धींना हरवत जुनिची यांनी ही डिझाईन स्पर्धा जिंकली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून मिळालेले सर्व धातू जुनिचींच्या ताब्यात दिले जातील; ज्यांचा वापर करुन ते मेडल्स (How are Olympic medals made) तयार करतील असंही तेव्हा घोषित करण्यात आलं होतं.

    ऑलिम्पिक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच रिसायकल केलेल्या धातूंचा वापर करुन पदकं तयार करण्यात आली आहेत. यासाठी 2017 पासूनच वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली होती. या टाकाऊ गोष्टींपासून चमकदार मेडल्स (Japan Olympic Medals) तयार करण्याची ही प्रक्रिया खेळाडूंच्या मेहनतीचे प्रतीक दर्शवते असं आयोजन समितीने म्हटलं होतं. म्हणजेच खेळाडू जसा सुरुवातीला अगदीच कच्चा असतो आणि तो प्रशिक्षण आणि सरावाच्या जोरावर खेळात प्रवीण होतो तसंच टाकाऊ वस्तुंपासून ही मेडल्स तयार केली आहेत असं समितीचं मत होतं. यासोबतच, ऑलिम्पिक आयोजन समितीने जपानच्या लोकांचे आभार मानले होते, ज्यांनी या कामासाठी मोठ्या प्रमाणात फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टी दान केल्या होत्या. हिच पदकं घेऊन आता जगभरातील खेळाडूं त्यांच्या मायदेशी परततील.

    First published:
    top videos

      Tags: Olympics 2021