मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी टीमचा डंका, क्वार्टर फायनलमध्ये धडक

Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी टीमचा डंका, क्वार्टर फायनलमध्ये धडक

भारतीय महिला हॉकी टीम (Women Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympic) क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे. भारतीय टीमने पूल एच्या मुकाबल्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 4-3 ने पराभव केला.

  • Published by:  Shreyas

टोकयो, 31 जुलै : भारतीय महिला हॉकी टीम (Women Hockey Team) टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympic) क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे. भारतीय टीमने पूल एच्या मुकाबल्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 4-3 ने पराभव केला. यानंतर ब्रिटनच्या विजयावर लक्ष लागलं होतं. ब्रिटनच्या महिला टीमने आयर्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. ब्रिटनच्या या विजयामुळे भारतीय महिला हॉकी टीमचं क्वार्टर फायनलचं तिकीट पक्कं झालं.

भारतीय महिला हॉकी टीमने पूल-एमध्ये दक्षिण आफ्रिकेला 4-3 ने मात दिली, पण भारताचं भवितव्य ब्रिटन-आयर्लंड यांच्यातल्या मॅचवर होतं. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 ऑगस्टला क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. तर इतर क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँड्स-न्यूझीलंड, स्पेन-ब्रिटन आणि जर्मनी-अर्जेंटिना यांच्यात मुकाबला रंगेल.

पुल-एच्या आपल्या अखेरच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली. भारताकडून वंदना कटारियाने (Vandana Katariya) तीन गोल तर नेहा गोयलने (Neha Goyal) एक गोल केला. वंदना कटारिया ऑलिम्पिकच्या एका मॅचमध्ये हॅट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

वंदनाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला चांगली सुरुवात करून देत चौथ्या मिनिटाला पहिला गोल केला, पण दक्षिण आफ्रिकेने बरोबरी करत गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्येही वंदनाने आक्रमक खेळ करत भारताला 2-1 ची आघाडी मिळवून दिली, पण दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये नेहाने भारतासाठी तिसरा गोल केला. यानंतर आफ्रिकेलाही आणखी एक गोल करण्यात यश आलं. त्यामुळे सामना 3-3 असा बरोबरीत होता. मॅचच्या 49 व्या मिनिटाला वंदनाने आणखी एक गोल करत भारताला 4-3 ने आघाडी मिळवून दिली.

First published:

Tags: Hockey, India, Olympics 2021